Join us  

घरात पालीची लहान लहान पिल्लं फिरतात? ६ उपाय, पालींचा सुळसुळाट होईल चटकन कम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:32 PM

Top 6 Methods to Get Rid of Lizards at Home :  पालींची विष्ठा घरभर दिसते त्यामुळे अस्वच्छता जाणवते. देव्हाऱ्याजवळ, किचनमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त लाईट्सचा उजेड असेल तिथे पाली जास्त दिसून येतात

पाली एकदा घरात शिरल्या की बाहेर पडायचं नावच घेत नाहीत. कधी घराच्या भिंतीवर तर कधी दरवाज्यांवर पाली दिसून येतात. मोठ्या पाली दिसल्या की लहान मुलंही घाबरतात. (Home Hack's) पालींची विष्ठा घरभर दिसते त्यामुळे अस्वच्छता जाणवते. देव्हाऱ्याजवळ, किचनमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त लाईट्सचा उजेड असेल तिथे पाली जास्त दिसून येतात. (Top 6 methods to get rid of lizards at home) पालींना दूर पळवण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत पण त्याचा फारसा उपयोग दिसून येत नाही.  केमिकल्सयुक्त स्प्रे वापरल्यामुळे एलर्जी होण्याचीही भिती असते. (How to get rid from lizard's at home) 

घर जास्तीत जास्त थंड ठेवण्याचा प्रयत्न करा

पालींना थंड घर अजिबात आवडत नाही अशावेळी खोली थंड ठेवून पालींपासून सुटाक मिळवता येते. पालींवर पाणी शिंपडल्यानेही त्या पळून जातात.  ज्या ठिकाणी पाली जास्त जमा होतात असं तुम्हाला वाटत असेल  त्या ठिकाणी पाण्याचा स्प्रे मारा.

काळ्या मिरीचा स्प्रे

पालींना पळवण्यासाठी तुम्ही काळ्या मिरीचा स्प्रे वापर करू शकता. यासाठी काळ्या मिरीचे दाणे वाटून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याचा स्प्रे संपूर्ण घरात शिंपडा. काळ्या मिरीनं डोळ्यांची जळजळ कमी होते.

कांद्याचे साल 

काद्यांच्या सालीच्या  वासाने पाली दूर पळतात. पालींना पळवण्यासाठी कांद्याचे साल पालींच्या जवळपास आणि भिंतींच्या कोपऱ्यांवर ठेवा. ज्या ठिकाणी पाली येतात तिथे कांद्याचे साल ठेवा. कांद्याचे साल पालींना दूर पळवण्यासाठी उत्तम ठरतील.

कॉफी

पालींना पळवण्यासाठी कॉफी पावडरचा वापर तुम्ही करू शकता. कॉफी पावडरमध्ये तंबाखू मिसळून त्याच्या लहान लहान गोळ्या तयार करा. या गोळ्या पाली ज्या ठिकाणी येतात तिथे ठेवा.

मिरची

लाल मिरची आणि हिरवी मिरची समान प्रमाणात घेऊन वाटून ती पाण्यात मिसळा . घराच्या कानाकोपऱ्यात, खिडक्या, दरवाज्यांवर हे पाणी शिंपडा.  लहान मुलांपासून ही स्प्रे बॉटल दूर ठेवा अन्यथा जळजळ होऊ शकते. 

लसूण

लसणाच्या तीव्र वासाने किडे पाली दूर पळतात. लसणाच्या पाकळ्या तुम्ही दरवाज्या किंवा खिडक्यांवर ठेवू शकता किंवा लसणाची पेस्ट पाण्यात मिसळून याचा स्प्रे पाली ज्या ठिकाणी येतात तिथे मारा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया