Join us  

किचनमध्ये पाली खूपच फिरत असतात? ६ सोपे घरगुती उपाय, पाली होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 5:35 PM

Top 6 Methods To Get Rid Of Lizards :

हिवाळा असो किंवा ऊन्हाळा  पालींचा धुमाकूळ प्रत्येकाच्याच घरी असतो. थंडीच्या दिवसांत आपण पालींपासून दूर राहीलो तरी तापमान बदलतं तसं घरात पाली शिरायला सुरूवात होते. (Effective Ways That Show How to Get Rid Of Lizards) पाली पाहून घरातील  लहान मुलंही घाबरतात. घरात पालींचा वावर वाढला की त्यांची विष्ठा सर्वत्र दिसते  ज्यामुळे गंभीर आजारही उद्भवू शकतात.  किचनमध्ये ठेवलेले काही पदार्थ  पालींना पळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या पदार्थांच्या तीव्र वासाने पालींना बाहेर पळावेसे वाटते.(Top 6 Methods To Get Rid Of Lizards) 

मांजर पाळा 

घरात पाली किंवा इतर किडे फिरत असतील तर तुम्ही आवडीनुसार मांजर पाळू शकता. मांजर पाळल्यास घरातील खूप कामं सोपी होऊ शकतात.  पालींमुळे फक्त उंदीरच नाही तर पालीसुद्धा दूर राहतात. ज्या घरात मांजरी असतात त्या घरात पाली फिरत नाही. घरात पाली जास्त येत असतील मांजरीमुळे पाली येण्याचे प्रमाण कमी होईल.

सिट्रोनेला किंवा लेमन ग्राम

घरात लेमन ग्रास किंवा  या पानांचा स्पे करून पालींना दूर पळवू शकता. घराच्या गार्डनमध्ये लेमन ग्रासची काही पानं लावा  पानं उकळवून त्यात लिंबू, फिनाईल गोळी किंवा मीठ घाला आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून  घराच्या कोपऱ्यावर या पाण्याने स्प्रे करा.

फिनाईलच्या पाण्याचा स्प्रे

घरातील फिनाईनचे झाकण उघडून  स्प्रे बॉटलमध्ये पाण्याबरोबर मिसळा. याव्यतिरिक्त लादी पुसताना आधी फिनाईलच्या पाण्याने घर स्वच्छ पुसून घ्या. 

लिंबाचा रस

लिंबाचा रस पालींना मारण्याचा एक परिणामकारक उपाय आहे. लिंबाच्या रसात पाणी मिसळून याचा पाण्याने स्प्रे करा. लिंबाचा आंबटपणा कमी होतो आणि जळजळ होत नाही. ज्यामुळे पाली घरापासून दूर राहतात.

लाल मिरचीचा स्प्रे

लिंबू आंबटपणा दूर करण्यासाठी आणि मिरचीचा तिखटपणा कमी करण्यासाठी ओळखला जातो. तिखट मिरची  वाटून पाण्यात मिसळा आणि पालींवर शिंपडा किंवा  पाली येत असलेल्या ठिकाणी या पाण्याचा स्प्रे करून ठेवा यामुळे पाली दूर होतील.

मिठाचं पाणी

माणसांपेक्षा प्राण्यांची त्वचा जास्त सेंसिटिव्ह असते.  मीठामुळे त्यांच्या त्वचेची जळजळ होते. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी मिसळून घराच्या कोपऱ्यावर स्प्रे करा. यामुळे पाली लवकर नष्ट होतात.

टॅग्स :सोशल व्हायरल