लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याची सालं फेकून दिली जातात पण याच लिंबाच्या सालीचा स्मार्ट पद्धतीनं वापर केला तर काम अधिक सोपं होऊ शकतं. (Kitchen Hacks) लिंबाच्या सालीचा वापर करुन तुम्ही होम क्लिनिंग लिक्वीड तयार करू शकता. लिंबाच्या सालीचा वापर कोणत्या पद्धतीनं करता येईल ते पाहूया. (Easy ways to use Lemon Peels in the Kitchen)
1) लिंबाच्या सालीचं क्लिनिंग लिक्विड कसं तयार करायचं?
साहित्य
२-३ लिंबाची साले, 1/2 कप पांढरा व्हिनेगर, १/२ कप पाणी, स्प्रे बॉटल
कृती
सगळ्यात आधी लिंबाची साले गोळा करून एका प्लेटमध्ये किसून घ्या नंतर एका स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर मिसळा. आता त्यात किसलेली लिंबाची साले घाला आणि नीट ढवळून घ्या आणि नंतर 1 तास ठेवा. तुमचा होम क्लिनर तयार आहे. या लिक्वीडनं किचन काउंटरपासून स्लॅबपर्यंत फवारणी करा आणि कापडाने स्वच्छ करा.
2) लिंबाच्या सालीनं चहाला द्या नवा ट्विस्ट
यामुळे तुमच्या चहाची चव अप्रतिम होईल आणि चवदारही. पण ते कसे तयार करावे जाणून घेऊया.
साहित्य-
1 कप लिंबाची साल, २ कप पाणी, 1 टीस्पून चहाची पाने, चिमूटभर काळे मीठ
कृती
सर्व प्रथम, एका पातेलीत चहासाठी पाणी ठेवा आणि ते उकळवा. त्यानंतर त्यात चहाची पाने घालून गरम करा. 5-7 मिनिटे शिजल्यानंतर वरून सालं किसून घ्या आणि त्यात घाला आणि 1 मिनिट थोडे शिजवा. ते एका कपमध्ये काढा आणि चिमूटभर काळे मीठ टाकून त्याचा आनंद घ्या.