महिला कोणत्याही क्षेत्रात मागे हटत नाही. प्रत्येक क्षेत्रात नाव कमवून अव्वल स्थानावर कार्यरत आहेत. नुकतंच भारतीय लष्कर आणि देशातील महिलांसाठी अभिमान वाटावा अशी कामगिरी हवालदार प्रीती रजक (Preeti Rajak) यांनी केली आहे. त्या एक उत्तम ट्रॅप शुटर असून, त्यांना २७ जानेवारी रोजी सुभेदार पदावर बढती देण्यात आली आहे.
सुभेदार प्रीती रजक या भारतीय सैन्यात 'सुभेदार' पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्यांची ही कामगिरी महिलांची ताकद आणि क्षमतेचे एक उल्लेखनीय उदाहरण दर्शवते(Trap shooter Preeti Rajak promoted, becomes Army's first woman subedar).
लेकीची माया आभाळाएवढी! लाडक्या लेकींसाठी आईबाबांची खास पोस्ट, नेते-अभिनेतेही झाले इमोशनल
प्रवास कसा सुरु झाला?
सुभेदार प्रीती रजक यांनी २२ डिसेंबर २०२२ रोजी मिलिटरी पोलिस कॉर्प्स सैन्यात प्रवेश घेतला. नेमबाजी शाखेत हवालदार म्हणून सैन्यात दाखल झालेल्या त्या पहिल्या गुणवंत खेळाडू होत्या. चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रजकने ट्रॅप महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून यासह विलक्षण कामगिरीने लष्करी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
लष्कराने कॉर्प्स मिलिटरी पोलिसमध्ये महिलांसाठी रँक उघडल्यानंतर, पहिल्यांदाच एका महिला शिपायाला लष्करात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून पदोन्नती देण्यात आली. या विशेष कामगिरीमुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचे वर्षाव होत आहे.
श्रीरामाची मूर्ती घडवणाऱ्या अरुणची फिल्मी लव्हस्टोरी, आधी झाली मैत्री-मग जडलं प्रेम, बायको म्हणते..
सुभेदार रजक सध्या भारतात सहाव्या क्रमांकावर आहे, आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या तयारीसाठी आर्मी मार्क्समनशिप युनिट येथे प्रशिक्षण घेत आहे. "तिच्या महान कामगिरीमुळे तरुणींच्या पिढ्यांना भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी तसेच व्यावसायिक नेमबाजीत, स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आज तिला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.'' असे लष्कराने म्हटले आहे.