Lokmat Sakhi >Social Viral > कमाल! फक्त 'राम-राम' लिहून साकारलं जबरदस्त चित्र; व्हायरल व्हिडिओ, पाहा सुंदर चित्र

कमाल! फक्त 'राम-राम' लिहून साकारलं जबरदस्त चित्र; व्हायरल व्हिडिओ, पाहा सुंदर चित्र

Sketch painting by writing ram ram : हे चित्र पूर्ण करण्यासाठी तरुणीने विविध रंगीत स्केच पेन वापरले. कलाकाराने स्केच कसे पूर्ण केले हे फॉलोअर्सना दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 02:28 PM2022-11-01T14:28:40+5:302022-11-01T15:02:37+5:30

Sketch painting by writing ram ram : हे चित्र पूर्ण करण्यासाठी तरुणीने विविध रंगीत स्केच पेन वापरले. कलाकाराने स्केच कसे पूर्ण केले हे फॉलोअर्सना दाखवले

Tremendous sketch painting by writing ram ram video goes viral on internet | कमाल! फक्त 'राम-राम' लिहून साकारलं जबरदस्त चित्र; व्हायरल व्हिडिओ, पाहा सुंदर चित्र

कमाल! फक्त 'राम-राम' लिहून साकारलं जबरदस्त चित्र; व्हायरल व्हिडिओ, पाहा सुंदर चित्र

सोशल मीडियावर  क्रिएटिव्हीचा पाऊस रोजच पडत असतो. रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात.  जे आपल्याला तासनतास गुंतवून ठेवतात. नुकताच नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलेला असाच एक व्हिडिओ राम दरबार रंगवणाऱ्या कलाकाराचा आहे.  या पेंटिंगमध्ये इतकं काय खास आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जोधपूरस्थित कलाकार डॉ. शिवानी मंदा यांची स्केचिंग शैली खूप चर्चेत आहे. पेंटब्रश किंवा रंगीत पेन्सिल वापरण्याऐवजी मंदा यांनी देवनागरी लिपीत 'राम' हा शब्द एक लाख अकरा वेळा पुन्हा पुन्हा लिहून हे चित्र काढलं. (Tremendous sketch painting by writing ram ram video goes viral on internet)

हे चित्र पूर्ण करण्यासाठी  विविध रंगीत स्केच पेन वापरले. कलाकाराने  प्रक्रिया देखील शेअर केली आणि त्याने स्केच कसे पूर्ण केले हे फॉलोअर्सना दाखवले. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यापासून तो ९.५ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 1.1 दशलक्ष लाईक्स आणि अनेक कमेंट्स देखील आहेत. तिची किएटिव्हीटी पाहून अनेकजण थक्क झाले.

तुझ्यासाठी कायपण! ट्रेनमध्ये बायकोच्या पायांना नेलपेंट लावत होते काका; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

एका इंस्टाग्राम कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले, 'छान. तुमच्या महान कार्याला सलाम. हे खरंच सोपे नाही. मी तुमच्या संयमाचे कौतुक करतो. दुसरी व्यक्ती म्हणाली, खूप, खूप सुंदर. खूप छान आहे.' तिसरा माणूस म्हणाला, 'काय टॅलेंट आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, 'व्वा, हे अप्रतिम आहे.' त्याचवेळी एका यूजरने म्हटले की, 'ही अप्रतिम कला आहे. हे क्वचितच पाहायला मिळते.' काही इतर इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी हार्ट इमोजी वापरून प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Tremendous sketch painting by writing ram ram video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.