शाळा म्हटलं की अभ्यास, परीक्षा, शिक्षा करणारे किंवा ओरडणारे शिक्षक अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. शिस्तीत वागण्याचे ठिकाण अशी शाळेची ओळख असली तरी आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ आपण या शाळेत एन्जॉय करत असतो. एकदा हे दिवस गेले की पुन्हा कधीच येत नाहीत. त्यामुळे शाळेतील प्रत्येक क्षण फक्त अनुभवायचा असतो. आपला सर्वांगाने विकास होण्यात शाळेची खूप महत्त्वाची भूमिका असते. अनेक लहान-मोठ्या गोष्टी शिकत आपण शाळेतून बाहेर पडतो आणि खऱ्या जगाला सामोरे जातो. (Viral Video) शाळेतले शिक्षक हे अनेकदा कडक असतात, पण काही शिक्षक आपल्या वयाचे होऊन आपल्यासोबत मज्जा करणारेही असतात,असे शिक्षक आपल्या कायम लक्षात राहतात (Trending dance video of students with teacher).
शाळेतील अभ्यासासोबतच इतर कलागुणांना वाव देण्यासाठी बहुतांश शाळांमध्ये संगीत, नृत्य, चित्रकला, वाद्यकला अशा विविध गोष्टी आवर्जून शिकवल्या जातात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक शिक्षिका वर्गातील ५ ते ६ मुलींसोबत अतिशय छान डान्स करताना दिसत आहे. या विद्यार्थिनी शाळेच्या पोषाखात असून शिक्षिकेने छानसा पंजाबी ड्रेस घातला आहे. वर्गातील बेंचेस दिसत असल्याने शाळेच्याच एखाद्या वर्गात त्या हे नृत्य करत असल्याचे दिसते. शिक्षिका आणि विद्यार्थिनी सगळ्या खूप उत्साहाने डान्सच्या स्टेप्स करत असल्याचे दिसत आहे.
कजरा मोहोब्बतवाला या गाण्यावर ठेका धरलेल्या या लहान मुलींच्या चेहऱ्यावरचे हावभाव अतिशय पाहण्यासारखे आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे, आमच्या फारशा परफेक्ट नसलेल्या डान्सने आम्हाला खूप छान आठवणी दिल्या आहेत. नेटीझन्सने या डान्सचे बरेच कौतुक केले असून शिक्षिका आणि विद्यार्थिनींमध्ये असलेल्या बॉन्डींगचेही कौतुक केले आहे. मनु गुलाटी असे या शिक्षिकेचे नाव असावे असे या इन्स्टाग्राम हँडलवरुन दिसत आहे. तर या विद्यार्थिनी दिल्ली पब्लिक स्कूलमधील असाव्यात असा अंदाज आहे. मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंदही या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत थोडे मोकळेपणाने वागल्यास तेही छान खुलतात असे म्हणायला हरकत नाही.