Lokmat Sakhi >Social Viral > हिमतीने जगणाऱ्या आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी लेकीने अभिमानाने केली ट्विट; नेटिझन्सही म्हणाले, शाबास..

हिमतीने जगणाऱ्या आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी लेकीने अभिमानाने केली ट्विट; नेटिझन्सही म्हणाले, शाबास..

Social viral: मुलांच्या लग्नात आनंदाने सहभागी होणारे पालक (parents) नेहमीच पाहतो आपण... पण आईच्या दुसऱ्या लग्नात आनंदी झालेली लेक (daughter) बघणं म्हणजे विरळच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:23 PM2021-12-17T17:23:12+5:302021-12-17T17:25:05+5:30

Social viral: मुलांच्या लग्नात आनंदाने सहभागी होणारे पालक (parents) नेहमीच पाहतो आपण... पण आईच्या दुसऱ्या लग्नात आनंदी झालेली लेक (daughter) बघणं म्हणजे विरळच..

Trending: daughter's tweet and post on social media about second wedding of her mother | हिमतीने जगणाऱ्या आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी लेकीने अभिमानाने केली ट्विट; नेटिझन्सही म्हणाले, शाबास..

हिमतीने जगणाऱ्या आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी लेकीने अभिमानाने केली ट्विट; नेटिझन्सही म्हणाले, शाबास..

Highlightsघटस्फोटानंतर नव्या जोडीदारासोबत आयुष्याची नव्याने सुरूवात करण्याचा हक्क प्रत्येकीला आहे.. असं म्हणत नेटकऱ्यांनी या लग्नाला सपोर्ट केला आहे. 

आईच्या किंवा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी देणं.. त्यांच्या आनंदात सहभागी होणं.. यासाठी मुलांचं मन खरंच खूप मोठं  असावं लागतं.. मुळात आपल्या पालकांच्या आयुष्यात दुसरं कोणी येणार आणि अशी अचानक आलेली व्यक्ती आपल्या कुटूंबाचा खूप महत्त्वाचा भाग होणार हेच मुळी सहजासहजी पचणारं नसतं.. म्हणून तर आईच्या दुसऱ्या लग्नात (mother's second marriage) आनंदानं सहभागी होणारी, तिच्या भावना समजून घेऊन आभाळाएवढं सामंजस्य दाखविणारी एक लेक सध्या सोशल मिडियावर (social media) भलताच कौतूकाचा विषय झाली आहे...

 

 @alphaw1fe' या नावाने Tweeter अकाऊंट असणाऱ्या लेकीची ही गोष्ट. या लेकीने तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर (share photos) केले आहेत. लग्नासाठी आईच्या हातावर सुरु असलेलं मेहंदी काढणं.. साखरपुड्याचे फोटो, आईचा आनंदी चेहरा.. असे सगळे फोटो तिने शेअर केले आहेत... विश्वास बसत नाही की आईचं दुसरं लग्न होत आहे.. अशी कॅप्शनही तिने या फोटोंना दिली आहे. तिने यात असंही लिहिलं आहे की मी आणि माझा १६ वर्षांचा भाऊ आम्ही दोघेही आईच्या दुसऱ्या लग्नासाठी पुर्वी अजिबात तयार नव्हतो.. पण आता आम्ही आमच्या कुटूंबात येऊ पाहणाऱ्या एका नव्या फादरली फिगरचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत आणि अतिशय आनंदी आहोत.. 

 

या मुलीच्या आईचा १५ वर्षांपुर्वीच घटस्फोट झाला होता. त्या आधीचं तिचं आयुष्य अतिशय कष्टदायी होतं.. आयुष्यातला तो कष्टदायी काळ संपला... १५ वर्षे तिने एकटेपणाही सहन केला. पण आता आई तिच्या आयुष्याची एक नवी सुरूवात करत आहे, हे पाहून ही लेक मनोमन सुखावली आहे. ही पोस्ट शेअर (instagram) करताच नेटिझन्सकडून तिचे भरभरून कौतूक करण्यात येत आहे. घटस्फोटानंतर नव्या जोडीदारासोबत आयुष्याची नव्याने सुरूवात करण्याचा हक्क प्रत्येकीला आहे.. असं म्हणत नेटकऱ्यांनी या लग्नाला सपोर्ट केला आहे. 

 

Web Title: Trending: daughter's tweet and post on social media about second wedding of her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.