Join us  

२१ वर्षाच्या मुलीचे जडले ५० वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम, लव्हस्टोरीमध्ये आला ट्विस्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2022 3:28 PM

Trending Love Story : या दोघांना पाहून अनेकदा ते बापलेक आहेत की काय असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला

ठळक मुद्देवय हा तर एक नंबर आहे पण मी प्रौढ असून माझे निर्णय मी स्वत: घेते असे ही तरुणी सांगतेआजही लोक त्यांना भरपूर टोमणे मारतात पण ते त्य़ाकडे दुर्लक्ष करुन एकमेकांवर प्रेम करणे पसंत करतात.

प्रेमाला जात, वय, वर्ण अशा कोणत्याच गोष्टीचे बंधन नसते असे आपण अगदी सहज म्हणतो. पण साधारणपणे आपल्या वयाच्या जवळपास असणाऱ्या व्यक्तीवर आपले प्रेम जडते आणि त्याच व्यक्तीसोबत आपण आयुष्य़ाची स्वप्ने बघतो. पण काहीवेळा या सगळ्या गोष्टींना छेद देणारी एखादी घटना आपल्या आजुबाजूला घडते. अशीच एक घटना नुकतीच घडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरलही झाली. अमेरिकेत एका १८ वर्षाच्या मुलीचे ४८ वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडले. हे दोघेही मागील ३ वर्षांपासून एकमेकांसोबत अतिशय आनंदात राहत आहेत. या दोघांनी नुकतीच सोशल मीडियावर आपल्य़ा प्रेमाची कबुली दिली (Trending Love Story). 

(Image : Google)

त्यानंतर मात्र या दोघांमध्ये एक दोन नाही तर तब्बल ३० वर्षाचे अंतर असल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. आज या मुलीचे वय २१ वर्ष असून तिच्या प्रियकराचे वय ५१ वर्षे आहे. या दोघांना पाहून अनेकदा ते बापलेक आहेत की काय असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. ७ वर्षांपासून एकमेकांसोबत असणाऱ्या या दोघांचे नाव नताली आणि बॉबी असे आहे. नताली आपल्या या रिलेशनबाबत सोशल मीडियावर कायम अतिशय खुलेपणाने बोलते. सुरुवातीला लोकांचे टोमणे ऐकून त्यांना काही प्रमाणात त्रास झाला होता. मात्र आता त्यांना त्याचा विशेष फरक पडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

नताली सांगते, तिच्या आई-वडीलांना जेव्हा या रिलेशनशिपबद्दल कळले तेव्हा त्यांना खूप राग आला होता, मात्र तिच्या आईवडीलांचाही एकमेकांशी घटस्फोट झाला आहे. सुरुवातीला तिला सोशल मीडियामधून आलेल्या कमेंटमुळे खूप त्रास झाला मात्र नंतर या लोकांना सडेतोड उत्तरे देण्याचे त्यांनी ठरवले. आजही लोक त्यांना भरपूर टोमणे मारतात पण ते त्य़ाकडे दुर्लक्ष करुन एकमेकांवर प्रेम करणे पसंत करतात. नताली म्हणते, वय हा तर एक नंबर आहे पण मी प्रौढ असून माझे निर्णय मी स्वत: घेते. लोकांनी आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करु नये असा सल्लाही ती लोकांना देते.    

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट