बॉलीवूड स्टार, सेलिब्रिटी हे तर सर्वसामान्यांसाठी चर्चेचे विषय असतातच. पण सेलिब्रिटींचे नातलग, मित्रमंडळी हे देखील कधीतरी असेच एकदम फोकसमध्ये येतात आणि त्यांच्याविषयी पण तुफान चर्चा रंगते. कारण सेलिब्रिटींच्या (celebrities) जवळची मंडळी नेमकी कोण आणि कशी हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांची असतेच.. आता अशीच जबरदस्त चर्चा सुरु आहे ती बॉलीवूडमधील २ दिग्गज अभिनेत्रींच्या भाच्यांची (niece of bollywood actresses).. मधुबाला आणि श्रीदेवी (Sridevi and Madhubala) यांच्या बहिणींच्या मुलींची.(Sridevi's sister and Madhubala's sister)
७०- ८० च्या दशकातली अतिशय देखणी अभिनेत्री म्हणून मधुबाला ओळखली जाते. तिच्यासारखे सौंदर्य तिच्यापुर्वीही कधीच नव्हते आणि तिच्यानंतरही झालेले नाही, असं मधुबालाबाबत नेहमीच बोललं जातं. अशा या सर्वांगसुंदर आणि अतिशय रुपवान अभिनेत्रीच्या भाचीची चर्चा सध्या सुरु आहे. मधुबालाच्या बहिणीची मुलगी परवीज सोमजी हिचे सौंदर्य थेट मधुबालाशी मिळते- जुळते आहे, सौंदर्याच्या बाबतीत ती अगदीच मधुबालावर गेली आहे, एवढंच नाही तर परवीजच्या सौंदर्यासमोर विश्वसुंदरी ऐश्वर्या रायही फिकीच आहे, अश काय काय चर्चा परवीजबाबत सुरु आहेत.
काही जणं तिच्या सौंदर्याबाबत एवढं भरभरून कौतूक करत असताना, काही जणांना मात्र हा उगाच टाईमपास वाटतो आहे. परवीज सौंदर्याच्या बाबतीत तिची मावशी मधुबालावर गेलेली तर नाहीच नाही, पण तिचे सौंदर्य ऐश्वर्याशीही स्पर्धा करणारे नाही, असं काही जणांनी ठासून म्हटलंय. आता परवीजचा हा फोटो पहा आणि ती तिच्या मावशीसारखी दिसते की नाही, हे तुम्हीच ठरवा..
आता अशीच काहीशी चर्चा सुरु आहे अभिनेत्री श्रीदेवीच्या बहिणीच्या मुलीची. तिचे नाव माहेश्वरी. माहेश्वरी ही तिच्या मावशीप्रमाणेच अभिनेत्री. दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिने अनेक दर्जेदार भुमिका केल्या आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून नाव कमविले. पण २००८ साली तिचा विवाह झाला आणि त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीला अलविदा केले.
माहेश्वरीबाबत सांगितली जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तिचे फिचर्स, तिचे सौंदर्य श्रीदेवीशी एवढे मिळते जुळते आहेत की अगदी श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी यादेखील त्याबाबतीत माहेश्वरीच्या मागे आहेत.