Join us  

शाहरुख आवडतो म्हणून 'तिने' मेकअप करत स्वतःलाच दिला शाहरुखचा 'चेहरा'..पाहा भन्नाट व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 3:00 PM

Social viral: मेकअप करून एखाद्याला छान सुंदर बनवता येतं... पण मेकअप करून कुणी चक्क शाहरुख खान (viral video) सारखं दिसू शकतं का... बघा या पोरीची कमाल, मेकअप करून बनली चक्क शाहरूख खान (girl transforms herself into Shahrukh Khan)...

ठळक मुद्देशाहरुख कोणता आणि तिचा मेकअप केलेला लूक कोणते हे देखील चटकन ओळखू येत नाही. 

शाहरुख खान (love for Shahrukh Khan) आवडतो म्हणून त्याचे सगळे चित्रपट बघणं.. त्याच्या चित्रपटातली गाणी ऐकणं.. त्यांच्या फोटोंचं कलेक्शन करणं हे सगळं समजतं.. पण शाहरुख खूप आवडतो म्हणून एका तरूणीने चक्क कमालच केली आहे. स्वत:ला शाहरूख बनविण्यासाठी तिनं काय काय केलं, याचा व्हिडियो सोशल मिडियावर कमाल व्हायरल झाला असून नेटकरी तिच्या कलेचं तोंडभरून कौतूक करत आहेत. 

त्याचं झालं असं की दिक्षिता (Dikshita) नावाची एक युवती दिल्लीला (Delhi girl) राहते. व्यवसायाने ती मेकअप आर्टीस्ट असून तिच्या क्षेत्रात तिने बऱ्यापैकी नाव कमावले आहे. शाहरुख खान हा तिचा आवडता हिरो. त्यामुळे तिने तिच्या या कलेचा एक भन्नाट उपयोग केला. तिने तिचा स्वत:चा मेकअप केला आणि स्वत:ला चक्क शाहरुख खानसारखा लूक दिला.

 

तिने तिचा हा व्हिडियो इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केला असून या व्हिडियोला अवघ्या काही दिवसांतच जबरदस्त लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. या तरूणीच्या कलेचे, तिच्या प्रतिभेचे नेटकरी तोंडभरून कौतूक करत आहेत. मेकअप करून स्वत:ला शाहरुखसारखा लूक देण्यासाठी तिला तब्बल ३ ते ४ तास लागले. त्यानंतर मात्र तिचा असा काही मेकअप झाला की ती हुबेहुब शाहरुख खान दिसू लागली. तिने मेकअप करून सर्वात शेवटी तिचा चेहरा आणि शाहरुखचा फोटो असे शेजारी शेजारी ठेवले असून यातला खरा शाहरुख कोणता आणि तिचा मेकअप केलेला लूक कोणते हे देखील चटकन ओळखू येत नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाशाहरुख खानइन्स्टाग्राममेकअप टिप्स