शिक्षित आणि नोकरदार स्त्रिया ज्या पद्धतीने घरातील कामे करतात त्याबद्दल अनेकदा विनोद केला जातो. समाजात अशी समजूत आहे की मुलगी शिकून नोकरीला जात असेल तर तिला घरची कामं कशी पटपट करावी हे कळत नाही. सोशल मीडियावरही असे व्हिडिओ रोज पाहायला मिळतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीये. वास्तविक, व्हिडिओमध्ये इंजिनियर सून जेवण बनवत आहे. स्वयंपाक करताना सासू तिला काहीतरी सांगते. नंतर सून तवाच उलटा मारते. (Trending video of engineer daughter in law who was baking roti with saas)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सासू आणि तिची सून स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवताना दिसत आहेत. गॅसची शेगडी चालू आहे आणि त्यावर तवा ठेवला आहे. तव्यावर भाकरीही ठेवली जाते. व्हिडिओमध्ये सासू सुनेला रोटी बनवायला शिकवत आहे. त्यानंतर सून रोलिंग लाटण्यानं रोटी लाटून भाजायला लागते. यावर सासू म्हणते की असं नाही, हाताने भाज. मग सून हाताने चपाती भाजते. हात जाळण्याच्या भीतीने सून चपातीला हात लावायला टाळाटाळ करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
डाळीतले किडे, दगडं काढण्याची सोपी ट्रिक वापरा; तासनतास न घालवता झटपट होईल काम
घाबरत घाबरत ती चपातीला हात लावते. त्यानंतर, सून काय करते हे पाहून तुम्हाला हसायला येईल. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा सासू सुनेला चपाती उलटी करायला सांगते तेव्हा सुनेला ते व्यवस्थित जमत नाही. यावर सासू कपाळाला हात लावून म्हणते, 'अरे देवा! या मुलीचे काय होईल?'
५ चुकांमुळे बाथरूममध्ये अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक; सर्वाधिक लोक करतात दुसरी चूक
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर perfectly_arranged नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत 4.8 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर या मजेदार व्हिडिओला 1.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत.