Join us  

कुरकुरे डोसा : कुरकुऱ्यांच्या डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ, करून पाहा क्रंची- क्रिस्पी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 12:18 PM

Kurkure dosa recipe: मसाला डोसा, बटर डोसा, चीज डोसा खाल्ला असणार... पण सध्या सोशल मिडियावर व्हायरल (social viral) झालेला हा कुरकुरे डोसा चाखून बघितलाय का कधी? (have you ever tried kurkure dosa?)

ठळक मुद्देव्हिडिओ पाहून हा कुरकुरे डोसा नक्कीच हटके असणार असं वाटतं... हा चटपटीत डोसा एकदा खाऊन पहाल तर नेहमीचा साधा डोसा खाणं विसरून जाल, असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे...

स्वयंपाक करताना नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात.. त्यातूनच तर विविध पदार्थ जन्माला येतात, असं आपल्याकडे वयस्कर महिला नेहमीच म्हणत असतात.. एका अर्थी हे बरोबर आहे.. पण आता तर या प्रयोगांच्या नावाखाली चक्की काहीही करणं सुरू आहे.. कधी रुहअफ्झा मॅगी तर कधी आईस्क्रिम डोसा.. कधी बटर घातलेला चहा तर कधी कधी आईस्क्रिम पाणीपुरी.. आता याच रांगेतला पण जरा चटपटीत आणि खरोखरंच चवदार लागत असावा, असं वाटणारा एक पदार्थ सोशल मिडियावर व्हायरल (kurkure dosa video viral) झाला आहे. 

 

सध्या जबरदस्त व्हायरल असलेला हा पदार्थ म्हणजे कुरकुरे डोसा.. आजवर बटर, मसाला, चीज असे वेगवेगळे डोसाप्रकार आपण नक्कीच ट्राय केले असणार.. पण आता मात्र कुरकुरे डोसा नावाचा भन्नाट प्रकार मार्केटमध्ये आला आहे. कुरकुरे डोसा करण्याचा व्हिडिओ सध्या बराच ट्रेण्डिंग आहे.. thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवर (instagram share) हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून हा व्हिडिओ बघता बघता चांगलाच व्हायरल झाला आहे. नवी दिल्ली येथील शालिमार बाग परिसरात हा डोसा विकला जातो. हा चटपटीत डोसा एकदा खाऊन पहाल तर नेहमीचा साधा डोसा खाणं विसरून जाल, असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे...

 

व्हिडिओ पाहून हा कुरकुरे डोसा नक्कीच हटके असणार असं वाटतं... डोसा बनविण्यासाठी त्या शेफने सगळ्यात आधी डोसा पीठ तापलेल्या तव्यावर टाकलं. यानंतर त्याने ते पीठ गोलाकार पसरविलं, त्यावर बारिक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकली. त्यावर कसली तरी लाल चटणी टाकली. त्यानंतर टोमॅटो सॉस आणि मेयोनिज घातलं. वरतून भरपूर बटर टाकलं आणि हे मिश्रण डोसावर पसरवलं..

यानंतर त्याने कुरकुरे या डोसावर पसरून टाकले.  त्यानंतर त्याने त्यावर किसलेलं पनीर टाकलं आणि हा गरमागरम चटपटीत डोसा सर्व्ह केला. ही चटपटीत रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही G2 कुरकुरेही वापरू शकता. कुरकुऱ्यांची चव उत्तम असेल तर हा डोसा अजून छान लागेल. त्यासाठी G2 कुरकुरे नक्कीच वापरता येतील. हा डोसा खरोखरंच खूप टेस्टी लागतो, असं काही खवय्ये म्हणत आहेत.

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.इन्स्टाग्राम