Join us  

घर कायम सुगंधित-फ्रेश ठेवण्यासाठी ३ स्वस्तात मस्त उपाय, कुबट वास गायब- घरात वाटेल प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 4:47 PM

Tricks To Smell Amazing At Home : घरात कधीकधी कुबट वास येतो, प्रसन्न वाटत नाही. रुम फ्रेशनर न वापरताही घर होईल सुगंधी यासाठी ३ सोपे उपाय

ठळक मुद्देदिवसभर काम करुन बाहेरुन घरात आलं की घर फ्रेश असावं अशी आपली किमान अपेक्षा असतेखूप पैसे खर्च न करता घरात सुगंध पसरवता आला तर...

आपलं घर किंवा एखादी खोली जास्त काळ बंद असेल तर घरात एकप्रकारचा कुबट वास यायला लागतो. घराचे बांधकाम जुने झाले असेल तर घराला एकप्रकारची ओल येते आणि दमटपणा वाटतो. इतकेच नाही तर काही वेळा आपल्या घरात पुरेसा हवाउजेड येत नसल्यानेही घरात कुबट वातावरण तयार होते. अशा वातावरणात आपल्याला फ्रेश तर वाटत नाहीच. पण त्यामुळे एकप्रकारचा दमट वास यायला लागतो. आरोग्याच्या दृष्टीनेही घरात असे कुबट वाटणे चांगले नसते. घर कितीही स्वच्छ केलं तरी अनेकदा हा वास कमी होत नाही. अशावेळी घरात कायम सुगंध यावा यासाठी आपण फारतर रुम फ्रेशनर मारतो. पण त्याचा परिणाम फारकाळ टिकत नाही. यासाठीच आज आपण असे काही सोपे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपले घर कायम सुगंधित राहण्यास मदत होईल (Tricks To Smell Amazing At Home). 

१. आपल्या घरात बऱ्याचदा व्हॅक्यूम एयर कंडीशनर्स फिल्टर्स असतात. शुद्ध हवा घरात यावी यासाठी त्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. हे फिल्टर्स काढून स्वच्छ करावेत आणि त्याच्या आतल्या बाजुने काही इसेन्शियल ऑईलचे काही थेंब टाकावेत. यामुळे हवेची झुळूक घरात आली की एकप्रकारचा सुगंध घरात येतो. 

२. एका ग्लासमध्ये कॉफीच्या बिया घ्या. यामध्ये मेणाचा बारीक दिवा लावा. दिव्यामुळे खालच्या कॉफीचा वास पसरण्यास मदत होते. कॉफीचा वास काहीसा सौम्य आणि तरीही एकदम हवाहवासा वाटणारा असतो. हा अगदी सहज करता येण्याजोगा उपाय असून त्यासाठी विशेष खर्चही येणार नाही. मात्र घरात पाहुणे येणार असतील किंवा थोडं फ्रेश वाटावं असं वाटत असेल तर हा उत्तम पर्याय आहे. 

३. एका कपात पाणी घेऊन त्यामध्ये १ चमचा रबिंग अल्कोहोल घाला. त्यात थोडं इसेन्शियल ऑईल घालून हे मिश्रण एका बाटलीत भरा आणि ते घरात मारा. यामुळे घरातला कुबटपणा तर जाईलच पण घर नकळत फ्रेश वाटायला मदत होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्वच्छता टिप्स