Join us  

मूड ऑफ असताना तृप्ती डिमरी खाते 'हे' २ पदार्थ, ती सांगते-मला स्वयंपाक करायलाही आवडतं पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 3:39 PM

Tripti Dimri's Favourite Food: काही दिवसांतच नॅशनल क्रश झालेल्या तृप्ती डिमरीच्या खाण्यापिण्यातल्या आवडीनिवडी बघा नेमक्या कशा आहेत...(Tripti Dimri reveals about her cooking experiments)

ठळक मुद्देवेगवेगळे फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करून फ्राय, शॅलो फ्राय या प्रकारातल्या वेगवेगळ्या रेसिपी, भाज्या करायला आवडतं. 

'ॲनिमल' चित्रपटानंतर तृप्ती डिमरी एकदमच प्रकाशझोतात आली आणि बघता बघता नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. काही दिवसांपुर्वीच आलेला तिचा 'बॅड न्यूज' चित्रपटही बराच चर्चिला गेला. त्या चित्रपटापेक्षाही जास्त चर्चा तृप्तीचीच झाली. एकंदरीतच आता तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी खूपच उत्सूकता असल्याचे दिसून येते. आपल्याला तिच्याकडे बघून वाटत नसलं तरी ती खूप चांगला स्वयंपाक करते म्हणे (Tripti Dimri reveals about her cooking experiments). याविषयी तिने स्वत:च एका मुलाखतीमध्ये माहिती दिली असून तिचा तो छोटासा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे (Tripti Dimri's Favourite Food). बघा यामध्ये तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आवडीनिवडी याविषयी ती नेमकं काय सांगते आहे..

 

तृप्ती डिमरी सांगते....

तृप्तीच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग foodophile_saloni या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती सांगते की तिला स्वयंपाक करायला आवडतो आणि ती तिच्यापुरता स्वयंपाक नेहमीच करत असते. ती म्हणते की मला खूप जास्त लोकांसाठी नाही करता येत.

पाठ दुखते म्हणून मुलं तक्रार करतात? डॉक्टर सांगतात त्यामागची ३ कारणं, मुलांची पाठदुखी थांबविण्यासाठी...

पण मोजक्या २- ३ लोकांसाठी करायचा असेल तर ती अनेक चवदार पदार्थ करू शकते. तिला आपले वरण, रस्सा भाजी असे रोजचे टिपिकल पदार्थ करायला नाही आवडत. तर त्याऐवजी वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करून फ्राय, शॅलो फ्राय या प्रकारातल्या वेगवेगळ्या रेसिपी, भाज्या करायला आवडतं. 

 

तृप्ती जेव्हा नाराज असते तेव्हा तिला काय खायला आवडतं, असा मजेशीर प्रश्नही तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली की मूड ऑफ असताना ती नेहमीच नूडल्स आणि मोमो हे दाेन पदार्थ खाते.

दिवाळीसाठी किचनची साफसफाई कुठून सुरू करावी सुचेना? ५ टिप्स- काम होईल सोपं आणि फटाफट

आपलंही बऱ्याचदा असंच असतं. नाराज झाल्यावर तशी खरंतर काहीच खाण्याची इच्छा नसते. पण तरीही भूक भागविण्यासाठी खावं लागतं. अशावेळी आपल्या आवडीचे पदार्थ समोर आले तर मग क्या बात है.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.तृप्ती डिमरी