Lokmat Sakhi >Social Viral > त्रिपुरारी पौर्णिमा: किसणी वापरुन करा ५ मिनिटांत ५० वाती- झटपट त्रिपुरवात करण्याची सोपी ट्रिक

त्रिपुरारी पौर्णिमा: किसणी वापरुन करा ५ मिनिटांत ५० वाती- झटपट त्रिपुरवात करण्याची सोपी ट्रिक

Tripurari Pournima 2024: फक्त त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमेसाठीच नाही तर एरवीही नेहमीच लागणाऱ्या दोरवाती झटपट बनविण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.(How to make tripurari vat) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 02:53 PM2024-11-14T14:53:07+5:302024-11-14T15:10:34+5:30

Tripurari Pournima 2024: फक्त त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमेसाठीच नाही तर एरवीही नेहमीच लागणाऱ्या दोरवाती झटपट बनविण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.(How to make tripurari vat) 

Tripurari Pournima 2024: How to make tripurari vat, tripur vat kashi karavi, easy and fast method of making tripur vat | त्रिपुरारी पौर्णिमा: किसणी वापरुन करा ५ मिनिटांत ५० वाती- झटपट त्रिपुरवात करण्याची सोपी ट्रिक

त्रिपुरारी पौर्णिमा: किसणी वापरुन करा ५ मिनिटांत ५० वाती- झटपट त्रिपुरवात करण्याची सोपी ट्रिक

Highlightsदोरवाती जर झटपट करता आल्या तर महागडी त्रिपुरवात आणण्याची गरजच नाही.

शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत आहे (Tripurari Pournima or Kartik Pournima 2024). देव दिपावली म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी त्रिपुर वात लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. त्रिपुर वात ही नेहमीच्या इतर वातींपेक्षा थोडी वेगळी असते. एरवी आपण दोन वाती एकत्र करून दिवा लावतो. पण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जी त्रिपुर वात लावली जाते त्यासाठी तब्बल ७५० दोरवाती एकत्र करून लावल्या जातात. एवढ्या मोठ्या संख्येने वाती करायच्या म्हटल्या तर त्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे अनेकजणी त्रिपुर वात घरी करण्याचा प्रयत्नही न करता ती सरळ विकत आणतात. पण दोरवाती जर झटपट करता आल्या तर महागडी त्रिपुरवात आणण्याची गरजच नाही (easy and fast method of making tripur vat). त्यासाठीच बघा किसनी वापरून झटपट वाती कशा वळायच्या..(tripur vat kashi karavi?)

 

झटपट दोरवाती करण्यासाठी खास टिप्स

किसनीचा वापर करून झटपट दोरवाती कशा करायच्या, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ swasth mast swadishth या सोशल मिडिया हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे.

धुतल्यानंतर स्वेटर, लोकरीचे कपडे सैलसर होतात, फिटींग बिघडते? ४ चुका टाळा, कपडे राहतील नव्यासारखे

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की कापूस व्यवस्थित पिंजून घ्या. जर तुमच्याकडे बाजारातून विकत आणलेला कापूस असेल तर तो पिंजून घेण्याची गरज नाही.

पालकांच्या 'या' गोष्टी वाढवतात मुलांवरचा ताण; म्हणूनच मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना कधीच.....

आता कापसाचे वातीच्या आकाराचे थोडे उभट आकार करा. त्यानंतर एका लांब काडीला ते गुंडाळा आणि ती काडी किसनीच्या वरच्या भागावर पोळपाटावर लाटणे फिरवतो, त्या पद्धतीने फिरवा. अशा पद्धतीने अवघ्या काही सेकंदातच एक वात तयार होऊ शकते.

 

ही झटपट वाती करण्याची ट्रिक वापरून तुम्ही अवघ्या १ मिनिटांतच कित्येक वाती करू शकता.

मुलं सारखी चिडतात, ओरडून बोलतात? 'ही' युक्ती करून पाहा, राग शांत होऊन प्रेमाने बोलू लागतील 

सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण एकदा हात बसला की हा हा म्हणता कित्येक वाती अगदी सहज करून टाकाल. कापूस, किसनी घरातच असेल तर एकदा हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 

 

Web Title: Tripurari Pournima 2024: How to make tripurari vat, tripur vat kashi karavi, easy and fast method of making tripur vat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.