Lokmat Sakhi >Social Viral > स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा... 

स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा... 

Truth About That Chlorine Smell in Swimming Pools: उन्हाळ्यात अनेक जण स्विमिंगला जातात. मुलांनाही पाठवतात. म्हणूनच स्विमिंगच्या पाण्याबाबतच्या या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेतच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 01:46 PM2024-04-19T13:46:09+5:302024-04-19T13:48:23+5:30

Truth About That Chlorine Smell in Swimming Pools: उन्हाळ्यात अनेक जण स्विमिंगला जातात. मुलांनाही पाठवतात. म्हणूनच स्विमिंगच्या पाण्याबाबतच्या या काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेतच..

Truth About That Chlorine Smell in Swimming Pools, why water in swimming pool have that particular smell | स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा... 

स्विमिंग पुलमधल्या पाण्याला कशामुळे वास येतो? बघा त्यामागचं खरं कारण, पोहण्यापुर्वी विचार करा... 

Highlightsज्या पाण्याचा खूप वास येतो, त्यात खूप क्लोरिन असते. त्यामुळे ते पाणी स्वच्छ असते, असे अनेकांना वाटते. पण.......

उन्हाळा आला की प्रत्येक शहरातले स्विमिंग पूल गर्दीने फुलून जातात. कारण एरवी वर्षभर हा छंद जोपासायला अनेकांना जमत नाही. पण उन्हाळ्यात मात्र गर्मीने हैराण झाल्यामुळे कधी एकदा पूलमधल्या थंडगार पाण्यात जाऊन पोहू, असं अनेकांना वाटतं. तिथली आणखी एक बहुतांश स्विमिंग करणाऱ्या लोकांना आवडत असते (Truth About That Chlorine Smell in Swimming Pools). आणि ती गोष्ट म्हणजे त्या पूलमधल्या पाण्याला येणारा एक विशिष्ट वास. हा वास घेऊन बरेच जण नॉस्टॅल्जिक वाटतं. हा वास क्लोरिनचा आहे, असं आपल्याला वाटतं. पण ते खरं नाहीये. (why water in swimming pool have that particular smell?)

 

स्विमिंग पूलमधल्या पाण्याची स्वच्छता करण्यासाठी त्यात क्लाेरिन टाकलं जातं. म्हणूनच पाण्याला असा वास येतो, असं आपण आजवर ऐकत आलेलो आहोत. पण ते कितपत खरं आहे, हे एकदा बघा.

बघा आयपीएलचं वेड! CSK चा लोगो घेऊन तयार केली लग्नपत्रिका, 'एवढी' ठेवली एन्ट्री फी.... 

याविषयीचे अनेक व्हिडिओ आणि माहिती आपल्याला गुगलवर मिळते. त्यानुसार असं सांगितलं आहे की स्विमिंग पूलमध्ये पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी जे क्लोरिन टाकतात, त्याला कोणताही वास नसतो. त्यामुळे त्या पाण्याला क्लोरिनचा वास येतो, हा आपला गैरसमज आहे. मुळात तो वास जो असतो तो क्लोरामाईन chloramines या कंपाउंडचा असतो.

 

frommers.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा पाण्यातल्या क्लोरिनची रिॲक्शन स्विमरच्या अंगाचा घाम, कॉस्मेटिक्स आणि युरीन यांच्यासोबत होते, तेव्हा त्या पाण्यातून क्लोरामाईन तयार होतं आणि त्याचा वास येतो.

मुलांना दूध आवडत नसल्यास 'ही' फळं द्या, भरपूर कॅल्शियम मिळून दात- हाडं होतील बळकट

त्यामुळे ज्या पुलमधून खूप जास्त वास येत असतो, त्या पाण्यात पोहण्यासाठी जाणे टाळा. ज्या पाण्याचा खूप वास येतो, त्यात खूप क्लोरिन असते. त्यामुळे ते पाणी स्वच्छ असते, असे अनेकांना वाटते. पण ज्या तीव्र वासामागचे हे सत्य स्विमिंग करण्यापुर्वी एकदा जाणून घ्या. 

 

Web Title: Truth About That Chlorine Smell in Swimming Pools, why water in swimming pool have that particular smell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.