Join us  

कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 12:26 PM

Cooking Tips and Tricks To Make Everyday Cooking Easy and Hassle Free : कुकरची शिट्टी कशी स्वच्छ करावी, बाटलीवरील चिकट स्टिकर्स कसे काढावेत, खलबत्त्यात लसूण ठेचताना ती उडू नये म्हणून सोप्या - लहान टिप्स..

किचनची व किचनमधल्या छोट्या - मोठ्या गोष्टींची आपण वेळच्या वेळी स्वच्छता ठेवत असतो. किचनमधील भांडीकुंडी, रोजच्या वापरातील उपकरण ही वेळच्या वेळी स्वच्छ केलीत तर त्यावर जास्त धूळ पडून ती खराब होत नाहीत. यासोबतच या काही उपकरणांची स्वच्छता वेळीच ठेवली तर ती योग्य पद्धतीने काम करतात. किचनमधील काही उपकरणे अशी असतात जी स्वच्छ करणे खूप किचकट काम असते, कुकरची छोटीशी शिट्टी ही त्यापैकीच एक. आपण कुकर रोज धुवून तो स्वच्छ करतो परंतु त्याच्या छोट्याशा शिट्टीकडे आपण फारसे लक्ष देत नाही.

 गृहिणींची किचनमध्ये सकाळी लगबग सुरु असते. काहीवेळा सकाळचा नाश्ता, टिफिन यांत इतकी गडबड होते की काहीतरी जादू व्हावी व चुटकीसरशी सगळी काम व्हावी असं गृहिणींना वाटत असत. सकाळच्या स्वयंपाकातील खूप काही काम अशी असतात जी खूप किचकट व वेळखाऊ असतात.स्वयंपाक घरातील अशी छोटी - मोठी काम चुटकीसरशी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपकरणांचा व ट्रिक्सचा वापर करतो. आपण काही सोप्या व झटपट ट्रिक्स वापरून किचनमधील (Try these tips to make cooking easier and hassle free) ही वेळखाऊ व किचकट काम अतिशय कमी वेळात लगेच करु शकतो. कुकरची  मळकी शिट्टी स्वच्छ करणे, लसूण पेस्ट बनवणे, स्वयंपाक घरातील काचेच्या बरणींवरील स्टिकर्स काढणे अशा छोट्या - मोठ्या कामांसाठी काही सोप्या झटपट ट्रिक्स पाहूयात(Cooking Tips and Tricks To Make Everyday Cooking Easy and Hassle Free).

१. कुकरची शिट्टी कशी स्वच्छ करावी ? (How to clean a pressure cooker whistle) 

कुकर तर आपण नेहमी धुवून स्वच्छ करतो. परंतु त्याच्या शिट्टीच्या स्वच्छतेकडे आपण फारसे लक्ष देत नाही. कुकरची शिट्टी ही आकाराने लहान असल्याने त्यात साचून राहिलेली घाण स्वच्छ करणे मोठे कठीण काम असते. कुकरची शिट्टी आपण वरचेवर साबण किंवा लिक्विड डिशवॉशने धुतो परंतु ती हवी तशी स्वच्छ होत नाही. अशावेळी कुकरची शिट्टी स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून बेकिंग सोडा व व्हिनेगर घालून त्यात ही शिट्टी २ ते ३ तास भिजवून ठेवावी. त्यानंतर ब्रशच्या मदतीने ही शिट्टी व्यवस्थित घासून स्वच्छ करुन घ्यावी. त्यानंतर पुन्हा एकदा साबण किंवा लिक्विड डिशवॉशने स्वच्छ धुवून घ्यावी. असे आठवड्यातून किमान १ ते २ दिवस केल्याने कुकरच्या शिट्टीवर मळ साचून राहत नाही. 

किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

२. खलबत्त्यात लसूण ठेचताना ती बाहेर उडते अशावेळी काय करावे ? (What to do when garlic flies out while crushing garlic?)

काहीवेळा आपल्याकडे आलं - लसूण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करण्याइतपत वेळ नसतो. याचबरोबर घाईच्यावेळी लसूण ठेचायची म्हणजे खूप किचकट व वेळखाऊ काम असते. बरेचदा आपण लसूण बारीक करण्यासाठी खलबत्त्याचा वापर करतो. अनेकवेळा घाई गडबडीत खलबत्त्यात लसूण किंवा  कोणताही पदार्थ ठेचताना तो उडून बाहेर पडतो. अशावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरु शकतो. खलबत्त्यात आलं, लसूण ठेचण्यापूर्वी त्यात चिमुटभर मीठ घालावे आणि मगच आलं - लसूण असे पदार्थ ठेचावेत, यामुळे खलबत्त्यातील ठेचलेला पदार्थ ठेचताना बाहेर उडत नाही. 

किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

३. काचेच्या बाटलीवरील चिकट स्टिकर्स कसे काढावेत ? (Easy method to remove labels from glass jars​​​​​​​)

अनेकवेळा आपण किचनमधील सॉस, लोणच्याच्या किंवा इतर पदार्थांच्या काचेच्या बाटल्या पुन्हा वापरण्यासाठी ठेवून देतो. या बाटल्या पुन्हा वापरण्यासाठी ठेवताना त्यावर चिटकवलेले स्टिकर्स आपण काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे स्टिकर्स खूपच चिकट असल्यामुळे सहजासहजी निघत नाहीत, आणि निघालेच तर बाटलीवर त्याचा चिकट गोंद हा तसाच चिकटून राहतो. अशावेळी एक भांड घेऊन त्यात पाणी भरून घ्यावे. तसेच ज्या बाटलीचा स्टिकर काढायचा आहे त्यात बाटलीत देखील पाणी भरुन घ्यावे. आता ही पाण्याने भरलेली बाटली पाण्याने भरलेल्या भांड्यात ३ ते ४ तास उभी ठेवून द्यावी. यामुळे या काचेच्या बाटलीवरील चिकट स्टिकर्स लगेच निघण्यास मदत होते.

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स