असं म्हणतात मुंबईचं (Mumbai) काळीज ही मुंबईचीलोकल (Local Train) आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो.
मात्र, सणवार आले की मुंबईकर लोकल ट्रेनला एखाद्या राणीसारखी सजवतात. आता बघा ना सर्वत्र तुळशी विवाहाचा माहोल सुरु आहे. तर, याच सणाचे औचित्य साधत काही मुंबईकरांनी चक्क लोकल ट्रेनमध्ये तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah) सोहळा जल्लोषात साजरा केला आहे. सध्या मुंबई लोकलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Viral) व्हायरल होत असून, यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे(Tulsi Vivah being performed in a local train in Mumbai).
बघावं ते नवलचं..
मुंबईकर सणवार साजरी करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि तुळशी विवाह हे सण देखील मुंबईकर धूमधडाक्यात साजरी करतात. मात्र, लोकल ट्रेनच्या भरगच्च गर्दीत प्रवाशी तुळशीचे लग्न लावताना दिसून आले. कर्जत-सीएसटीएम लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांनी हे लग्न लावले असून, त्यांनी तुळशी विवाह एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये लोकलचा डबा कागदाच्या तोरणांनी सजवला आहे. लग्नातील पद्धतीप्रमाणे आतंरपाठही पकडला आहे. शिवाय बरेचशे पुरुष मंडळींनी डोक्यावर पांढरी टोपीही घातली आहे. तर एका बाजूला नवरदेव आणि दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीने तुळस पकडली आहे. तसंच ऊसाची कांडीही दिसत आहे. शिवाय एक व्यक्ती मंगलाष्टके बोलत आहे. तर, काही प्रवासी आपल्या मोबाईलअध्ये हे सर्व चित्र कैद करत आहे.
परी म्हणू की अप्सरा! सारा अली खानची सोनसळी पिवळी साडी, पाहा गोव्यातली खास अदा
हा व्हायरल व्हिडिओ 'आमची मुंबई' या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून, त्यांनी शेअर करत, 'तुळशी विवाह मुंबई एडिशन' असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षावही केला आहे.