Lokmat Sakhi >Social Viral > पाण्यावर तुळशीची रांगोळी काढण्याची हटके ट्रिक, ५ मिनिटांत रांगोळी काढा; शेजारचेही विचारतील सिक्रेट

पाण्यावर तुळशीची रांगोळी काढण्याची हटके ट्रिक, ५ मिनिटांत रांगोळी काढा; शेजारचेही विचारतील सिक्रेट

Tulsi Vivah Rangoli 2024 : Floating Rangoli - How to make rangoli on water : यंदा तुळशी विवाहानिमित्त पाण्यावरती सुंदर - आकर्षक रांगोळी काढा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 12:39 PM2024-11-12T12:39:32+5:302024-11-12T17:15:10+5:30

Tulsi Vivah Rangoli 2024 : Floating Rangoli - How to make rangoli on water : यंदा तुळशी विवाहानिमित्त पाण्यावरती सुंदर - आकर्षक रांगोळी काढा..

Tulsi Vivah Rangoli 2024 : Floating Rangoli - How to make rangoli on water | पाण्यावर तुळशीची रांगोळी काढण्याची हटके ट्रिक, ५ मिनिटांत रांगोळी काढा; शेजारचेही विचारतील सिक्रेट

पाण्यावर तुळशीची रांगोळी काढण्याची हटके ट्रिक, ५ मिनिटांत रांगोळी काढा; शेजारचेही विचारतील सिक्रेट

दिवाळी आली की रांगोळीची लगबग सुरु होते (Rangoli 2024). रांगोळीचे विविध प्रकार काढले जातात (Diwali). दिवाळी संपल्यानंतरही म्हणजेच तुळशी विवाहापर्यंत (Tulsi Vivah 2024) दाराबाहेर रांगोळी काढण्यात येते. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या विशेष दिवशी लोक तुळशी विवाहाचे आयोजन करतात. दाराबाहेर सुंदर रांगोळी काढतात.

रांगोळीचे विविध डिझाइन्स आपण काढत असतो. पण दाराबाहेर काही जण तुळशीची रांगोळी काढतात, अनकेदा रांगोळी खराब होते. जर रांगोळी खराब होऊ नये असे वाटत असेल तर, आपण पाण्यावरतीही रांगोळी काढू शकता. आता तुम्ही म्हणाल पाण्यावरती रांगोळी कसं शक्य आहे? एका युक्तीने आपण पाण्यावरती सुंदर तुळशी विवाह स्पेशल रांगोळी काढू शकता(Tulsi Vivah Rangoli 2024 : Floating Rangoli - How to make rangoli on water).

अशी काढा पाण्यावरती सुंदर रांगोळी


- पाण्यावरती तुळशीची रांगोळी काढण्यासाठी एक भांडं घ्या. त्यात पाणी ओता. भांडं पाण्याने भरल्यानंतर चहाची गाळणी घ्या. पाण्यावरती चहाच्या गाळणीने रांगोळी पसरवा. पाण्यावरती रांगोळीचा थर तयार होईल. हा थर जाड तयार करण्याचा प्रयत्न करा.

काखेतला काळपटपणा जाईल -‘अशी’ वापरा चमचाभर ही पांढरी पावडर, काही दिवसात दिसेल फरक

- शक्यतो गडद रंगाचा वापर करा. आता पांढऱ्या रांगोळीने तुळशीची कुंडी तयार करा. नंतर ब्राऊन रंगाने तुळशीचे फांद्या काढा, आणि हिरव्या रंगाने तुळशीची पानं काढा.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

- तुळशीच्या कुंडीत आपण हवा तो रंग भरू शकतो. आणि फुलांच्या पाकळ्याने रांगोळी सजवू शकतो. अशा प्रकारे पाण्यावरती तुळशीची सुरेख रांगोळी तयार. 

Web Title: Tulsi Vivah Rangoli 2024 : Floating Rangoli - How to make rangoli on water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.