Join us  

ट्विंकल खन्ना सांगतेय वय झालं म्हणून आवडत्या गोष्टींना ‘नाही’ म्हणताय, ‘एक’ गोष्ट सगळ्यात आधी कचऱ्यात फेका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 8:28 PM

Twinkle Khanna's Viral Post: वय झालं आता हे काय मला शोभणार का... आता कुठे हे करायचं वय राहीलं का.. असं अवघ्या तिशी पस्तिशीमध्ये म्हणत असाल तर ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna playing guitar) नेमकं काय सांगतेय ते ऐकाच...

ठळक मुद्देती म्हणतेय की तुमच्या आवडीची गोष्ट, एखादी कला शिकण्यासाठी कधीच खूप उशीर झालेला नसतो.

अनेक जणींना वेगवेगळे छंद असतात. कुणाला छान शास्त्रीय नृत्य आवडत असतं, तर कुणाला चित्रकला आवडत असते. कुणाला कुकींगमध्ये भारीच इंटरेस्ट असतो. म्हणून मग त्यात आणखी छान करण्यासाठी वेगवेगळे कुकींग क्लासेस लावण्याची इच्छा असते. पण लहानपणी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना अभ्यास, ट्यूशन, परीक्षा या चक्रात अनेक जणी इतक्या अडकून जातात की मग त्यांचे छंद बाजूलाच पडतात.. मग होते करिअरला सुरुवात. तेव्हा तरी वाटतं की आता तरी करू, नोकरी करून करू.. पण काही केल्या जमत नाही..

 

त्यानंतर येतो आयुष्यातला अतिमहत्त्वाचा टप्पा.. तो म्हणजे लग्नाचा.. लग्न झालं की एका मुलीचं सगळं आयुष्य बदलून जातं. उरलं सुरलं आयुष्य मग मुलं झाल्यावर बदलून जातं. मग छंद कधी मागे पडून जातात ते कळतंच नाही. दुसऱ्या कुणाचं पाहिल्यावर लक्षात येतं की अरे हे तर आपल्यालाही आवडत होतं.. पण आपण केलंच नाही. मग मुलं मोठी झाल्यावर जेव्हा थोडा वेळ उरतो, तेव्हा आपल्या राहीलेल्या छंदांची आठवण येते. पण त्या वेळी आपण नेमकी कच खातो आणि वयाचा बहाणा आपल्या आणि आपल्या छंदाच्यामध्ये दत्त म्हणून उभा करतो. असंच काहीसं तुमचंही झालं असेल तर ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna is learning to play guitar) शेअर केलेली ही पोस्ट एकदा वाचाच..

 

अक्षय कुमारशी (Akshay Kumar) लग्न केलं आणि ट्विंकल खन्ना तिच्या संसारात जमली. बाॅलीवूडला तिनं रामराम केलं असलं तरी इंटेरिअर डेकोरेटर म्हणून तिची स्वतंत्र करिअर लाईन तिने निवडली आणि त्यात ती चांगला जम बसवून आहे. तिचंही वय आता ४५ च्या पुढे गेलंय. पण वय झालं म्हणून आपल्याला आवडणारी एखादी नवी गोष्ट करणं टाळायचं हे तिला मुळीच मान्य नाही. म्हणूनच तर या वयात तिने गिटार शिकायचं मनावर घेतलं असून सध्या ती गिटारचा जोरदार सराव करते आहे. गिटार वाजवितानाचा तिचा एक व्हिडिओही तिने इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केला आहे.

 

यामध्ये ती म्हणतेय की वय हा फक्त एक आकडा आहे. तो उचला आणि सरळ डस्टबिनमध्ये फेकून द्या. कारण एखादी तुमच्या आवडीची गोष्ट, एखादी कला शिकण्यासाठी कधीच खूप उशीर झालेला नसतो. याच्या स्वरांमधलं मला अजून काहीही समजत नाही. पण माझ्या मुलांसोबत बाॅण्डिंग करण्यचा एक नवा प्रयत्न करते आहे. त्यासाठीच गिटार शिकायचं मनावर घेतलं आहे. मुलं मोठी झाल्यानंतर खरोखरंच अनेकींच्या आयुष्यात रिकामपण येतं. कारण स्वत:चं करिअर, छंद त्यांनी कधीच सोडून दिलेली असतात. अशा रिकामपणामुळे मग अनेक शारिरीक मानसिक त्रास मागे लागतात. एकटं पडल्याची जाणीव होऊ लागते. हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर ट्विंकलप्रमाणे आपल्या आवडीचं असं नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलट्विंकल खन्नासेलिब्रिटीइन्स्टाग्राम