२०२३ वर्ष सरलं आणि २०२४ या नव्या वर्षाचं आपण सगळ्यांनीच उत्साहात स्वागत केलं. वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मणाऱ्या बाळांचं नेहमीच जरा विशेष कौतूक असतं. बाळाच्या जन्मानेच नव्या वर्षाची सुरुवात होणाऱ्या पालकांचा आनंदही काही वेगळाच असतो. असाच आनंद न्यू जर्सी येथे राहणाऱ्या आणि नव्यानेच पालक झालेल्या बिली हम्फ्री आणि इव्ह हम्फ्री (Billy Humphrey and Eve A Humphrey) या दाम्पत्यालाही झाला (Twins enter the world in different years). पण त्यांच्या मुलांच्या जन्माबाबत मात्र खूपच भन्नाट मजेशीर गोष्ट घडली. (Viral story of twins from new jersey)
तर झालं असं की बिली आणि इव्ह यांना नुकतीच जुळी बाळं झाली. त्या दोन बाळांच्या जन्मामध्ये अवघ्या काही मिनिटांचा फरक आहे. पण तरीही एका बाळाचा जन्म २०२३ या वर्षात तर दुसऱ्या बाळाचा जन्मा २०२४ या वर्षात नोंदविला गेला आहे. Ezra असं त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव. त्याचा जन्म ३१ डिसेंबरला रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी झाला. याच दिवशी त्याच्या वडिलांचा म्हणजेच बिलीचा पण वाढदिवस असतो. तर मुलगा Ezekiel याचा जन्म रात्री १२ वाजून २८ मिनिटांनी झाल्याने त्याची जन्मतारीख १ जानेवारी २०२४ अशी नोंदविली गेली. वेगवेगळ्या वर्षांत जन्मलेल्या या जुळ्या भावंडांची गोष्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.