दिल्ली-एनसीआरमध्ये कुत्र्यांवरून मारामारी होणं सामान्य झाले आहे. यासंबंधीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. ग्रेटर नोएडाच्या ACE ASPIRE हाऊसिंग सोसायटीमध्ये ताजे प्रकरण समोर आले आहे. तेथे एका कुत्र्याला लिफ्टमध्ये नेण्यासाठी दोन महिला आपापसात वाद घालू लागल्या. त्याचा व्हिडिओ 8 सप्टेंबरपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Two women arguing over taking dog in lift in greater noida ace aspire society video goes viral)
ग्रेटर नोएडातील बिसराख पोलीस स्टेशन हद्दीतील एस एस्पायर हाऊसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये जाण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला. लिफ्टमधील महिलेने कुत्रा आणि कुत्र्याच्या मालकिणीला लिफ्टमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. याशिवाय लिफ्ट थांबवूनही महिला बराच वेळ उभी राहिली.
लिफ्टमध्ये कुत्र्याला आणलं म्हणून दोन महिला आपसात भिडल्या; पाहा मारामारीचा व्हिडिओ
महिलेने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये ती महिला कुत्रा घाणेरडा आणि पट्टा नसलेला आहे असे म्हणताना ऐकू येते. ती महिला दुसऱ्या महिलेला ओळखत नसल्याचे सांगत आहे. ती कोणत्या नंबरच्या फ्लॅटमध्ये राहते हे तिला माहीत नाही. लिफ्टच्या बाहेर एक महिला फोन घेऊन हजर आहे, जी लिफ्ट थांबवून उभी आहे. तिच्या मागे एक कुत्रा बसलेला दिसतो.
ही महिला या कुत्र्यासोबत कुठून आली, सोसायटीच्या कोणत्या फ्लॅटमध्ये ती राहते? माहीत नाही, या आधी सोसायटीत पाहिलं नाही. हे सर्व सांगून ती एक व्हिडिओ बनवत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला आणि कुत्र्याशिवाय एक गार्डही उभा असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लिफ्टमध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्याची बातमी समोर येत असताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गाझियाबाद आणि नोएडामध्ये अशाच दोन घटना समोर आल्या आहेत.