Join us  

डोईवर पदर आणि बुलेट सुसाट! ' तिचा ' आत्मविश्वास पाहा, कैसी धाकड है..व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 5:42 PM

Social Viral छोरियां छोरों से कम नहीं होती ! धाकड महिलांची बुलेटवरून स्टंटबाजी.. व्हिडिओ व्हायरल

प्रत्येकालाच बुलेट या गाडीची क्रेझ असते. बुलेट म्हटलं की आपल्याला सैराट या चित्रपटातील अर्चना आठवते. जी ड्रेस आणि गॉगल घालून तोऱ्यात बुलेट चालवते. बुलेटवर स्टंट करण्याचे किंवा बुलेट चालवण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका बुलेट रायडिंगचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. कारण या व्हिडिओत एक महिला लेहेंगा चोळी परिधान करून बुलेट चालवत आहे. यासह तिच्या मागे आणखी एक महिला डबल सीट बसली आहे. सध्या या व्हिडिओवर कमेंट करत त्या दोन महिलांचे कौतुक केले जात आहे.

हा देसी स्टाईल बुलेट चालवणाऱ्या महिलेचा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लेंहेंगा घातलेली एक महिला वेगाने बुलेट चालवताना दिसत आहे. तिच्याबरोबर एक महिला देखील बसली आहे. डोक्यावर पदर, कपाळी टिक्का आणि मनमोकळेपणाने हसत या दोघी बुलेट चालवण्याचा आनंद घेत आहेत.

या व्हिडिओमधील मुख्य आकर्षण, बुलेट चालवण्यासाठी त्या महिलेचा आत्मविश्वास नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही महिला बुलेट चालवत असताना हा व्हिडिओ कोणीतरी बनवला आहे. ज्या प्रमाणे महिला बुलेट चालवते आहे, त्याचप्रमाणे व्हिडिओ बनवणारी व्यक्तीदेखील बाइकवर बसून व्हिडिओ शूट करत आहे. हा व्हिडिओ सोनाओमी गुरजार यांच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल