Lokmat Sakhi >Social Viral > गुळाचे 'हे' २ प्रकार माहिती आहेत का? बघा यातला नेमका कोणता गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं...

गुळाचे 'हे' २ प्रकार माहिती आहेत का? बघा यातला नेमका कोणता गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं...

How To Identify Adulteration In Jaggery?: बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे गूळ मिळतात. त्यातला कोणता घ्यावा आणि कोणता टाळावा, याविषयीची ही माहिती एकदा वाचाच...(Which type of jaggery is harmful for health?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 02:37 PM2023-12-05T14:37:08+5:302023-12-05T14:38:17+5:30

How To Identify Adulteration In Jaggery?: बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे गूळ मिळतात. त्यातला कोणता घ्यावा आणि कोणता टाळावा, याविषयीची ही माहिती एकदा वाचाच...(Which type of jaggery is harmful for health?)

Types of jaggery, How to identify adulteration in jaggery? Which type of jaggery is harmful for health? Which type of jaggery we should avoid? | गुळाचे 'हे' २ प्रकार माहिती आहेत का? बघा यातला नेमका कोणता गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं...

गुळाचे 'हे' २ प्रकार माहिती आहेत का? बघा यातला नेमका कोणता गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं...

Highlightsआपल्या घरीही आपण अनेकदा पाहिलं असेल की घरी आणलेला गूळ कधी केशरी रंगाचा असतो तर कधी लालसर. कधी कधी तर अगदी डार्क चॉकलेटी रंगाचा गूळही मिळतो. या गुळांमध्ये नेमका काय फरक आहे ते पाहा..

हल्ली प्रत्येक गोष्टीतच खूप भेसळ केलेली दिसते. जवळपास सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये काही ना काही भेसळ केल्याच्या बातम्या  आपण नियमितपणे वाचत असतो. असं भेसळयुक्त अन्न खाणं आरोग्यासाठी घातकच. त्यामुळे शक्यतो अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्याच्या ज्या काही साध्या- सोप्या ट्रिक्स आहेत, त्या आपल्याला माहिती असायलाच पाहिजेत. (Types of jaggery and How to identify adulteration in jaggery?)अशीच गुळातली भेसळ ओळखण्याच्या या काही टिप्स आपण आता पाहूया... गुळाचे प्रकार कोणते आणि त्यापैकी कोणता गूळ आपण  घ्यावा, याविषयी  बघा ही माहिती.(Which type of jaggery we should avoid?)

 

गुळाचे प्रकार काेणते आणि कसा ओळखायचा भेसळीचा गूळ?

गूळ कोणकोणत्या प्रकारचा असतो आणि त्यापैकी केमिकल्स असणारा गूळ तसेच नैसर्गिक, सेंद्रिय गूळ नेमका कोणता आणि तो कसा ओळखायचा याविषयीची माहिती madhurasrecipe या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

घरात ठेवण्यासाठी ६ इनडोअर प्लांट्स, घर नेहमीच राहील सदाबहार....

आपल्या घरीही आपण अनेकदा पाहिलं असेल की घरी आणलेला गूळ कधी केशरी रंगाचा असतो तर कधी लालसर. कधी कधी तर अगदी डार्क चॉकलेटी रंगाचा गूळही मिळतो. या गुळांमध्ये नेमका काय फरक आहे ते पाहा..

सुहाना खानही घालते कधी कधी कमी किमतीचे कपडे आणि बुटं, बघा तिच्या या ड्रेसची किंमत किती..

केशरी रंगाचा जो गूळ असतो, त्यामध्ये सोडा टाकलेला असतो. तसेच त्यातली मळी काढून टाकण्यासाठी त्यात इतरही अनेक घटक टाकलेले असतात. त्यामुळे त्या गुळाचा रंग केशरी दिसतो.

चॉकलेटी किंवा लालसर रंगाचा जो गूळ असतो, त्याला आपण चिक्कीचा गूळ असंही म्हणतो. हा गूळ नैसर्गिक असतो.

त्याचप्रमाणे गुळाचा एक प्रकार अगदी चॉकलेटी रंगाचाही असतो. तो सेंद्रिय गूळ म्हणून ओळखला जातो.

 

कोणता गूळ खाऊ नये?

केशरी रंगाचा जो गूळ असतो, तो भेसळयुक्त असतो. हा गूळ खाणे टाळावे. 

सर्दीमुळे नाक बंद झालं, श्वास घ्यायला त्रास होतो? १ सोपा उपाय करा- १० मिनिटांत नाक मोकळं होईल

ज्या गुळाची चव थोडी खारट लागते, ज्या गुळात चिकटपणा कमी असतो आणि तो अगदीच भुसभुशीत असतो, असा गूळही खाऊ नये.

पाण्यात टाकल्यावर जो गूळ कमी वेळात विरघळतो, असा गूळ खावा. गूळ पाण्यात विरघळण्यास उशीर लागत असेल तर तो भेसळयुक्त आहे, हे ओळखावे. 

 

Web Title: Types of jaggery, How to identify adulteration in jaggery? Which type of jaggery is harmful for health? Which type of jaggery we should avoid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.