सॅण्डविज बनवणं तसं सोपं. त्यातही त्याला फक्त हनी, चीज किंवा सॉस लावायचा असेल, तर ते तर आणखी सोपं. पण एवढं सोपं कामही अंतराळ यानात करणं किती अवघड आहे आणि ते करताना किती धमाल येते, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये दुबईचे अंतराळवीर सुलतान अल नेयाडी (Sultan Al Neyadi, astronaut from the UAE) हे अंतराळ यानात सॅण्डविज बनवताना दिसत आहेत. ६ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर असताना त्यांनी सॅण्डविज बनविण्याचा हा प्रयोग केला आहे. त्यांनी स्वत:च हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ (Viral Video Of Making Sandwich) चांगलाच गाजत आहे.
कसं तयार केलं सॅण्डविज?
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की अंतराळवीराने फक्त ब्रेड आणि हनी म्हणजेच मध या दोनच गोष्टी वापरल्या आहेत.
एक पैसाही खर्च न करता त्वचा हाेईल सुंदर- दिसाल तरुण, रोज फक्त ५ मिनिटे करा हे काम - सुरकुत्या गायब
व्हिडिओच्या सुरुवातीला तर आपल्याला फक्त मधाची एक बाटली हवेत तरंंगताना दिसते. नंतर नेयाडी समोर येतात. त्यांनी आणलेला ब्रेडही काही वेळ हवेत तरंगताना दिसतो.
Have you ever wondered how honey forms in space? 🍯
— Sultan AlNeyadi (@Astro_Alneyadi) August 20, 2023
I still have some Emirati honey left that I enjoy from time to time. Honey has many benefits, especially for the health of astronauts. pic.twitter.com/RrjQYlNvLD
यानंतर ते मधाची बाटली फक्त दाबतात. त्यानंतर लगेच मधाचा एक मोठा फुगा वर येतो आणि बाटलीवर धरलेल्या ब्रेडला चिटकतो. ब्रेडवर मध अजिबात पसरत नाही. एखाद्या फुग्याप्रमाणे किंवा गोटीप्रमाणे गोळा हाेऊन फक्त ब्रेडवर चिटकून बसतो.
गुरुत्वाकर्षणामुळे ब्रेड उलटा केला तरी त्यावरचा मध काही खाली पडत नाही. अशा पद्धतीने तयार केलेलं हे सॅण्डविज हातात धरून बसण्याचीही गरज नाही. येता जाता खाल्लं तरी काम होतं... असा हा भन्नाट व्हिडिओ बघायला खरोखरच खूप गंमत येते.