Lokmat Sakhi >Social Viral > लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात! पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..

लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात! पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..

UAE-based Indian businessman hosts daughter’s wedding aboard private jet : हौसेला मोल नाही, बापाने लावलं लेकीचं विमानात लग्न, आकाशात घेतले सात फेरे, चर्चा तर मग होणारच ना राव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2023 02:37 PM2023-11-26T14:37:05+5:302023-11-26T14:38:03+5:30

UAE-based Indian businessman hosts daughter’s wedding aboard private jet : हौसेला मोल नाही, बापाने लावलं लेकीचं विमानात लग्न, आकाशात घेतले सात फेरे, चर्चा तर मग होणारच ना राव..

UAE-based Indian businessman hosts daughter’s wedding aboard private jet | लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात! पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..

लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात! पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..

आयुष्यभर स्मरणात राहील असा एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न (Wedding). सध्या बरेच जण विविध प्रकारे लग्न सोहळ्याचे आयोजन करतात. काही जण डेस्टिनेशन वेडिंग करतात. तर काही लग्नात हटके गोष्टी करून आपल्या लग्नात चारचांद लावतात. प्रत्येकाला असे वाटते की आपलं लग्न अशा ठिकाणी व्हावे, ज्यामुळे ते लग्न प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील. असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण एका जोडप्याने लग्नाची गाठ चक्क प्रायव्हेट जेट (Private Jet) म्हणजेच विमानात बांधली आहे.

ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? यू्एईमधील प्रसिद्ध भारतीय व्यावसायिकाने आपल्या मुलीचं लग्न धरतीतलावर नसून आकाशात लावले आहे (Social Viral News). ते प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक नक्की आहेत तरी कोण? या लग्नाची सोशल मीडियात एवढी चर्चा का होत आहे?(UAE-based Indian businessman hosts daughter’s wedding aboard private jet).

लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात!

दिवाळी सरली की अनेकांना लग्नाचे वेध लागते. तुळशीचं लग्न पार पडलं की अनेकांच्या घरात सनईचे सूर ऐकू येतात. पण एका जोडप्याने आपल्या लग्नातील सनईचे सूर प्रायव्हेट जेटमध्ये वाजवले आहे, आणि या लग्नाची चर्चा सोशल मीडियात खूपच रंगली आहे. यू्एईमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपती दिलीप पोपले यांनी आपल्या मुलीचा विवाह चक्क विमानात लावून दिले आहे. हा अनोखा विवाह सोहळा २४ नोव्हेंबर रोजी ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यात पोपले यांचे मित्र आणि नातेवाईक यांचा समावेश होता.

शॉर्ट ड्रेसमध्ये आलिया भट दिसते 'फायर', पण नेटकऱ्यांना हा ड्रेस खटकला, ट्रोल केले कारण..

या लग्नाच्या निमित्ताने वधू-वरांसह सर्वांनी दुबई ते ओमान असा तीन तासांचा प्रवास केला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिलीप पोपले दुबईत राहतात. आपल्या मुलीचा विवाह हटके करण्याचे त्यांचे स्वप्न होते. १९९४ मध्ये पोपले यांचं लग्नही एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये पार पडलं होतं.

काही मिनिटात व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल

ऑस्ट्रेलियाने जिंकला वर्ल्ड कप आणि चर्चा एका भारतीय तरुणीची! कोण ती, मिचेलबरोबरचे फोटो व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाची आतील बाजू दिसत आहे. शिवाय विमान आतून एका मंडपाप्रमाणे सजवण्यात आले आहे. सुरुवातीला मंडळी हिंदी गाण्यावर ठेका धरताना दिसून येत आहे. नंतर त्याच विमानात या जोडप्याने सात फेरे घेतले. व्हिडीओच्या शेवटी दिलीप यांची मुलगी अन् जावई हे सर्वांचे आभार मानतात. या आगळ्या वेगळ्या लग्नाला लोकांनी पसंती दर्शवली आहे. 

Web Title: UAE-based Indian businessman hosts daughter’s wedding aboard private jet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.