अनेकदा आपण ऐकतो की पालक आपल्या मुलाचे नाव एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती किंवा ठिकाणाच्या नावावर ठेवतात, तर कोणी आपल्या मुलाचे नाव देवाच्या नावावरून ठेवतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की पालकांनी आपल्या मुलाचे नाव खाण्याच्या पदार्थावर ठेवले आहे? हे प्रकरण ब्रिटनचे आहे, जिथे एका नवजात बाळाचे नाव भारतीय डिश 'पकोडा' असे ठेवण्यात आले आहे. (Social Viral)
वास्तविक, आयर्लंडच्या न्यूटाउनबेमध्ये कॅप्टन्स टेबल नावाचे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. अलीकडेच, रेस्टॉरंटने सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. रेस्टॉरंट स्टाफनं फेसबुकवर लिहिले की, आमच्या येथे वारंवार येणा-या एका जोडप्याने आपल्या नवजात मुलाचे नाव रेस्टॉरंटच्या एका डिशवरून ठेवले आहे आणि डिश पकोडा आहे. (Uk parents name their child after indian dish pakora)
रेस्टॉरंट स्टाफनं कॅप्शनमध्ये लिहिले की, आम्ही त्याच पकोड्यांबद्दल बोलत आहोत ज्याचा आस्वाद आम्ही पावसाळ्यात चहासोबत घेतो. रेस्टॉरंटने नवजात मुलाचा फोटो शेअर करत लिहिले, 'आमच्या जगात स्वागत आहे पकोडा! आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही! रेस्टॉरंटने 'पकोड्या'सह काही पदार्थांच्या नावांसह बिल पावतीचा फोटोही शेअर केला आहे.
ब्रिटनच्या जोडप्यानं आपल्या पोराचं नाव ठेवलं पकोडा; कारण वाचून पोट धरून हसाल
सोशल मीडियावर ही बातमी येताच अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये पकोडाचे अभिनंदन केले, तर काही लोक त्यावर मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, मला चिकन आणि टिक्का अशी दोन मुले आहेत. एकाने लिहिले की हे नाव कुत्र्या-मांजरीला शोभेल, माणसाला नाही. एका महिला युजरने लिहिले की, मी दोनदा गरोदर राहिले आणि त्या काळात माझ्या आवडीच्या गोष्टी केळी आणि टरबूज होत्या. देवाचे आभार, मी याबद्दल विचार केला नाही आणि माझ्या मुलांचे नाव त्याच्या नावावर ठेवले नाही. दुसर्याने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की हे माझे मूल आहे, त्याचे नाव चिकन बॉल आहे.