लहानपणी भूत प्रेताच्या गोष्टी आपण ऐकल्याच असतील. नाव जरी कोणी घेतलं तरी काही जणांचा थरकाप उडतो. असतात की नसतात याबाबत सर्व प्रकारचे दावे केले जातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की भूत वास्तविक असते, तर काही लोकांच्या मते भूत - प्रेत असे काही नसते. भूत हे फक्त मनाचे भ्रम आहेत. मात्र, कधी-कधी याच्याशी संबंधित अशी काही प्रकरणे समोर येतात, ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो.
असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. एका महिलेने वर्षभरापूर्वी एका भुताशी लग्न केल्याचा दावा केला होता, पण आता त्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे असे तिचे मत आहे. त्यामुळे आता तिला घटस्फोट हवा आहे. सध्या या महिलेची कहाणी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नक्की प्रकरण काय आहे पाहूयात(UK Woman Who Married Ghost Wants Divorce).
लॅडबायबल या वेबसाईटनुसार, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेचे नाव रॉकर ब्रोकार्ड आहे. ती व्यवसायाने गीतकार, कवी आणि कलाकार आहे. तिने दावा केला आहे की, ती एडवर्डो नावाच्या भूताच्या प्रेमात पडली, नंतर त्याच्याशी २०२२ साली लग्न केलं. तिच्या म्हणण्यानुसार, त्यांची केमिस्ट्री पहिल्या भेटीतच बसली आणि त्यानंतर, काही महिन्यातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वरण-मसाल्यांचे डाग पडल्याने कुकरचं झाकण पिवळं पडलंय? ३ टिप्स, शिट्टी आणि झाकण होईल स्वच्छ
मात्र, आता रॉकरचे म्हणणे आहे की, तिच्या पतीने म्हणजेच एडवर्डो भुताने तिचे आयुष्य नरक बनवले आहे. त्याला त्याच्या जबाबदाऱ्याही कळत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, रॉकरचे म्हणणे आहे की, ''एडवर्डो रात्री उशिरा अचानक बेडरूममध्ये येतो आणि न सांगता तिथून निघूनही जातो. काही वेळेस पाठलाग करतो, कधी येतो - कधी जातो काही कळत नाही, त्यामुळे नात्यात दुरावा येऊ लागला आहे.''
भूत सोडण्यास तयार नाही
पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर
रॉकरच्या म्हणण्यानुसार, ''आता मला या विचित्र लग्नातून बाहेर पडायचे आहे. यासाठी मी मॅरेज काउन्सीलरची मदत घेतली आहे. यासह मी तंत्र-मंत्राचा आधारही घेतला आहे. जेव्हा मी एडवर्डोला आपल्या नात्याला सिरीयस घे असं सांगितलं तेव्हा, त्याने ही गोष्ट गंभीरतेने घेतली नाही. मला तो रात्रीचं रडणाऱ्या बाळाचा आवाज काढून त्रास देतो.'' तिने पतीपासून म्हणजेच भुतापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला असला तरी, भूत तिला सोडायला तयार नाही, असा तिचा दावा आहे.