Lokmat Sakhi >Social Viral > ऐकावं ते नवलच, ४८ वर्षांपूर्वी ‘तिने’ केला होता नोकरीसाठी अर्ज, त्यांनी आता उत्तर दिले की..

ऐकावं ते नवलच, ४८ वर्षांपूर्वी ‘तिने’ केला होता नोकरीसाठी अर्ज, त्यांनी आता उत्तर दिले की..

UK women found her job application reply after 48 years : पत्ता बदलला तरीही इतक्या वर्षांचे पत्र मिळाले म्हणजे कमालच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 12:40 PM2024-10-08T12:40:16+5:302024-10-08T12:46:41+5:30

UK women found her job application reply after 48 years : पत्ता बदलला तरीही इतक्या वर्षांचे पत्र मिळाले म्हणजे कमालच..

UK women found her job application reply after 48 years : 48 years ago 'she' had applied for the job, now they replied that.. | ऐकावं ते नवलच, ४८ वर्षांपूर्वी ‘तिने’ केला होता नोकरीसाठी अर्ज, त्यांनी आता उत्तर दिले की..

ऐकावं ते नवलच, ४८ वर्षांपूर्वी ‘तिने’ केला होता नोकरीसाठी अर्ज, त्यांनी आता उत्तर दिले की..

आपण एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केल्यावर त्यांच्याकडून कधी रिप्लाय येणार याची वाट बघत बसतो. अगदी त्याच आठवड्यात नाही आला तर येत्या महिन्या दोन महिन्यात तरी आपल्याला त्यांच्याकडून काही ना काही कळतेच. नाहीच कळाले तर आपल्याला ही नोकरी मिळाली नाही असे आपण समजतो आणि दुसरीकडे प्रयत्न चालू ठेवतो. एका महिलेनेही नोकरीसाठी अशाचप्रकारे अर्ज केला होता, तिला १-२ नाही तर तब्बल ४८ वर्षांनी कंपनीने उत्तर दिले (UK women found her job application reply after 48 years) . 

लंडनमधील लिंकनशायर याठिकाणी राहणाऱ्या टिजी हडसन नामक महिलेच्या बाबतीत ही गोष्ट घडली असून इतक्या वर्षांनी आपण अर्ज केलेल्यांचा रिप्लाय आल्याने त्याही आश्चर्यचकीत झाल्या. हडसन यांनी १९७६ मध्ये मोटारसाईकल स्टंट रायडरच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. या नोकरीचे पत्र पाहून त्या म्हणाल्या इतकी वाट पाहिल्यानंतर हे पत्र मिळाले हे खूपच अमेझिंग आहे. तर त्याचे झाले असे की त्यांनी कंपनीला पाठवलेले पत्र पोस्ट ऑफीसमध्ये हरवले होते. हे पत्र पोस्ट ऑफीसमधील एका ड्रॉवरमध्ये अडकले. इतक्या वर्षांनी पोस्ट मध्ये काम करणाऱ्यांना ते सापडले आणि त्यांनी हडसन यांना ते पाठवले.

(Image : Google)
(Image : Google)

 

इतक्या वर्षानंतरही आपण या नोकरीसाठी आपल्या घरात बसून कशाप्रकारे पत्र टाइप केले होते आणि पाठवले होते हे आपल्याला आठवते असे त्या म्हणाल्या. या नोकरीसाठी आपण बराच वेळ वाट पाहिली. ही नोकरी न मिळाल्याने आपण काही काळ निराशेत होतो असेही त्यांनी सांगितले.  कारण मोटारसायकल स्टंट रायडर होण्याचे आपले स्वप्न होते असे त्या म्हणाल्या. हा जॉब न मिळाल्याने आपण स्नेक हँडलर, घोड्यांशी बोलणाऱ्या म्हणून, एरोबेटीक पायलट आणि फ्लाईंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. 

Web Title: UK women found her job application reply after 48 years : 48 years ago 'she' had applied for the job, now they replied that..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.