Join us

शुज घातले म्हणून महिलेला केले निलंबित, नंतर कंपनीला बसला मोठा दणका, न्यायाधीश म्हणाले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2024 14:13 IST

UK women gets fired for wearing sports shoes : कामावर स्पोर्टशूज घातले म्हणून तरूणीला निलंबित केले.

आपण लोकांना कामावरून काढून टाकले किंवा हकालपट्टी केली अशा बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. (UK women gets fired for wearing sports shoes)पण कधी शुजसाठी कर्मचाऱ्याचे निलंबन झालेले ऐकले आहे का? युकेमध्ये राहणाऱ्या एलिझाबेथ बेनासी नामक मुलीबरोबर असा प्रकार घडला आहे. ही मुलगी वीस वर्षांची असून मॅक्सिमस युके सर्विसेस नावाच्या कंपनीत काम करत होती. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तिला कामावरून काढून टाकण्यात आले.(UK women gets fired for wearing sports shoes) निलंबनाचे कारण ऐकून तिला धक्काच बसला.

एलिझाबेथने विविध मिडिया माध्यमांना तिच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे.(UK women gets fired for wearing sports shoes) तिने सांगितले, स्पोर्टशूज ऑफिसच्या गणवेशात मान्य नाहीत आणि मी ते घातले म्हणून माला काढून टाकण्यात आले.(UK women gets fired for wearing sports shoes) पण मला हे नियम कधी सांगितले गेले नाहीत त्यामुळे यात माझी काहीच चूक नाही. एवढेच नव्हे तर इतर कर्मचारी सर्रास स्पोर्टशूज घालून  येतात, पण त्यांना कधी कोणी काहीही बोलत नाही. मला मात्र कामावरून काढून टाकण्यात आले. एलिझाबेथचे असे म्हणणे आहे, तिला सहकर्मचाऱ्यांकडून आणि मॅनेजरकडून नेहमी लहानांसारखी वागणूक दिली जायची.(UK women gets fired for wearing sports shoes) कारण ती तरुण आणि नवीन आहे. तिला वयामुळे सतत त्रास दिला जायचा. 

न्यायाधिकाऱ्यांनी मात्र एलिझाबेथला न्याय दिला. तिला तब्बल ३२ लाखाची नुकसान भरपाई कंपनी कडुन मिळाली.(UK women gets fired for wearing sports shoes) कंपनीने सफाई देताना स्पोर्टशूज आमच्या गणवेशाविरुद्ध आहेत, त्यामुळे आम्हाला एलिझाबेथला निलंबित करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. न्यायाधीश फोरवेल यांनी सांगितले की निलंबनाचे हे कारण असू शकत नाही.(UK women gets fired for wearing sports shoes) तुम्ही नवीन कर्मचाऱ्यांना नियम समजावून सांगितल्याशिवाय त्यांना ते कळणार तरी कसे? तिला नियमावली दिल्याचे कुठेही नमूद नाही. चूक निश्चितच कंपनीची आहे.

या खटल्यानंतर तरुण कर्मचाऱ्यांसाठी चांगले वातावरण कंपन्यामध्ये असते का? नवकर्मचाऱ्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली जाते का? खासकरून महिला कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक दिली जाते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आजच्या वर्किंग वुमनच्या जमा‍न्यात अशा घटना ऐकायला मिळणं फार लाजिरवाणी गोष्ट आहे.(UK women gets fired for wearing sports shoes) अनेक घटना तर समाजासमोर येतसुद्धा नाहीत. कर्मचाऱ्यांनी सजग राहणं फार गरजेचे आहे.

टॅग्स :महिलाकर्मचारीनोकरी