व्हॅलेंटाईन्स डे (valentines day) च्या निमित्ताने अनेक तरुण जोडपी एकमेकांना प्रेमाची कबुली देत आहेत. काही जण प्रेमाचा स्विकार करत आहेत. प्रेमाचा स्विकार करताना जगाची थोडी भिती वाटतेच. म्हणून जगासमोर आपलं प्रेम जाहीरपणे सांगायला किंवा कबुल करायला अनेक जण घाबरतात. कॅरोलिना शिनोचंही (Ukraine born miss japan Karolina Shiino) सुरुवातीला तसंच झालं. पण नंतर मात्र तिने जगासमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली. पण असं जाहीरपणे करणं तिला खूपच महागात गेलं. कारण यामुळे तिला तिने मोठ्या मेहनतीने जिंकलेला 'मिस जपान' (Miss Japan beauty pageant) हा किताब परत करावा लागला. वाचा कॅरोलिना शिनोची ही नेमकी गोष्टी घडली तरी कशी....
ही खरीखुरी प्रेमकथा आहे जपानमध्ये राहणाऱ्या पण जन्माने युक्रेनची असणाऱ्या कॅरोलिना शिनोची. ती २६ वर्षीय तरुणी तिच्या वयाच्या पाचव्या वर्षी आईसोबत जपानला आली आणि तिथेच स्थायिक झाली.
नाक चोंदल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- चटकन नाक मोकळं होईल
काही वर्षांपुर्वी तिला जपानचे नागरिकत्वही मिळाले. जानेवारी महिन्यात झालेल्या Miss Japan beauty pageant या स्पर्धेत ती सहभागी झाली आणि तिने तो किताब पटकावलाही. तिच्या विजयावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण जे लोक मुळचे जपानचे नाहीतच, ज्यांची चेहरेपट्टी जपानी धाटणीची नाही, त्या लोकांना स्पर्धेत भाग कसा घेऊ दिला, यावर त्यांचे आक्षेप होते. पण तरीही स्पर्धेच्या आयोजकांनी तिच्या गुणवत्तेवर तिला विजयी घोषित केले.
यानंतर मात्र जपानमधील एका मासिकाने कॅरोलिनाचे एका विवाहित डॉक्टरसोबत अफेअर असल्याचे वृत्त दिले. सुरुवातीला ब्यूटी स्पर्धेच्या आयोजकांनी कॅरोलिनाला याबाबत काही माहिती नव्हती असे सांगितले.
मुलतानी मातीमध्ये ४ गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा, त्वचेवर होईल जादू- येईल कमालीचा ग्लो
पण नंतर मात्र कॅरोलिनाने स्वत:च कबुली दिली की तिचे त्या डॉक्टरवर प्रेम आहे. शिवाय तो विवाहित आहे, हे देखील तिला माहिती आहे. तिच्या या विधानानंतर मिस जापान असोसिएशनने तिच्यावर फसवणूकीचा आरोप केला असून तिने मिस जपान हा मुकूट वापस करावा, असं सांगितलं.
उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग
त्यानुसार कॅरोलिनानेही तिचा मुकूट वापस केला आहे, असं जपानी माध्यमांकडून कळविण्यात आलं. प्रेमासाठी काय पण.... अशी भूमिका घेतलेल्या कॅरोलिनाची ही स्टोरी व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने चांगलीच व्हायरल झाली आहे. प्रेम ही तिची खूप खाजगी गोष्ट असून या कारणावरून तिचा किताब तिच्याकडून परत घेणं, अनेकांना मुळीच पटलेलं नाही.