Lokmat Sakhi >Social Viral > पाण्याची टाकी न घासता होईल स्वच्छ, पाणीही राहील महिनोमहिने साफ; त्यात फक्त १ लाकडाचा तुकडा..

पाण्याची टाकी न घासता होईल स्वच्छ, पाणीही राहील महिनोमहिने साफ; त्यात फक्त १ लाकडाचा तुकडा..

Unable To Clean The Water Tank Regularly? Just Drop This Piece Of Wood In It : 'या' लाकडाचा १ तुकडा पाण्याच्या टाकीत टाका; मग बघा कमाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2024 04:02 PM2024-11-29T16:02:15+5:302024-11-29T16:03:19+5:30

Unable To Clean The Water Tank Regularly? Just Drop This Piece Of Wood In It : 'या' लाकडाचा १ तुकडा पाण्याच्या टाकीत टाका; मग बघा कमाल..

Unable To Clean The Water Tank Regularly? Just Drop This Piece Of Wood In It | पाण्याची टाकी न घासता होईल स्वच्छ, पाणीही राहील महिनोमहिने साफ; त्यात फक्त १ लाकडाचा तुकडा..

पाण्याची टाकी न घासता होईल स्वच्छ, पाणीही राहील महिनोमहिने साफ; त्यात फक्त १ लाकडाचा तुकडा..

पाण्याशिवाय जीवन अपूर्ण आहे (Cleaning Tips). पाण्याचा वापर प्रत्येक गोष्टींसाठी होतो. आपण सर्वजण दैनंदिन जीवनात अनेक कारणांसाठी पाण्याचा वापर करतो (Social Viral). या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक घराच्या छतावर पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीतून स्वयंपाकघर, वॉशरूम, टॉयलेट, बाथरूममध्ये पाणी पोहोचतं. निरोगी राहण्यासाठी, स्वच्छ पाणी पिणे महत्त्वाचे आहे. कारण दुषित पाण्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

घराच्या छतावर किंवा स्लॅबवर बसवलेल्या टाकीमध्ये पाणी असतेच. पाण्याची टाकी रिकामी होताच ती पुन्हा भरली जाते. पण महिनोमहिने किंवा वर्षभर टाकी स्वच्छ न केल्यास, त्यात घाण जमा होऊ लागते. बॅक्टिरियाचे प्रमाण वाढल्यावर पाण्यात जंतू वाढू लागतात. पण मोठी टाकी साफ करणं आपल्याला कठीण जातं. अशा परिस्थितीत टाकीची साफसफाई करणं गरजेचं आहे. जर आपल्याला न घासता टाकी स्वच्छ करायचं असेल तर, १ ट्रिक फॉलो करा. मिनिटात टाकी स्वच्छ होईल(Unable To Clean The Water Tank Regularly? Just Drop This Piece Of Wood In It). 

टाकीचे पाणी घाण होणार नाही कधीच कारण..

अनेकदा छतावर असलेल्या टाकीमधले पाणी लवकर घाण होते. कारण त्याचे झाकण उघडे असते, आणि त्यात धूळ, माती आणि किडे पाण्यात उतरतात. ज्यामुळे पाणी लवकर घाण होते. जर पाणी लवकर घाण होऊ नये, शिवाय घासण्याची झंझट वाढू नये असं वाटत असेल तर, पाण्यात एक लाकूड टाका.

जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

कोणताही लाकूड टाकू नका, त्यात जामून लाकडाचा तुकडा टाका. हे औषधी लाकूड पाण्यात टाकल्याने पाणी महिनोमहिने खराब होणार नाही.

जामून लाकडामुळे पाणी खराब कसं होणार नाही?

वास्तविक, जामुन लाकूड फायटोकेमिकल्स सोडते. या रसायनामुळे पाण्यात वाढणाऱ्या कीटकांचा नाश होऊ शकतो. हे रसायन पोटात गेल्यास खूप फायदा होतो. विविध रोगांशी लढण्यास मदत करते.

युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन

जुन्या काळी लोकांकडे आरओ वॉटर फिल्टर नव्हते तेव्हा ते जामुनच्या लाकडाचा तुकडा त्यांच्या भांड्यात टाकत असत. ज्यामुळे पाणी लवकर खराब होत नसे. 

Web Title: Unable To Clean The Water Tank Regularly? Just Drop This Piece Of Wood In It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.