सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्या कॅरम खेळताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या पोस्टचा सारांश देण्यासाठी एक मथळा जोडला. "शांत राहा आणि कॅरम खेळा!" असे महिला आणि बाल विकास मंत्री यांनी लिहिले.
साडी नेसलेल्या स्मृती इराणी हटके स्टाईलनं कॅरम खेळताना दिसल्या. राजकारणी महिला इतर राजकारणी पुरूषांसह हा खेळ खेळत होत्या. स्मृती इराणी अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. याआधी त्यांनी काशीतील स्वतःचा हा फोटो शेअर केला होता. (Smriti irani plays carrom in new viral video watch)
कॅरम खेळासाठी एकाग्रता आणि निरीक्षण कौशल्य आवश्यक आहे. कॅरमसाठी तुम्ही नेहमी लक्ष केंद्रित केले पाहिजे, एक चुकीचा शॉट आणि तुमचा विरोधक तुमच्या नुकसानाचा सर्वोत्तम उपयोग करू शकतो. खेळाकडे आवश्यक आहे. ही सवय तुम्हाला दैनंदिन जीवनात एकाग्र होण्यास मदत करते.
किचनमध्ये फार झुरळं झालीत? झुरळांना कायमचं घालवण्यासाठी करा ५ इफेक्टीव्ह उपाय
गेल्या काही दिवसात स्मृती इराणींचा मॉडलिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मॉडेलिंग करण्यासाठी स्मृती यांना त्यांच्या वडिलांकडून नकार मिळाला. मात्र, त्यांच्या पाठीशी त्यांची आई खंबीरपणे उभी होती. त्यांच्या आईने पैशांची व्यवस्था करून, स्मृती यांना मिस इंडियामध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबईत पाठवले. स्मृती इराणीने मिस इंडियामध्ये भाग घेतला, व अंतिम फेरी गाठली. पण टॉप-८ मधून बाहेर पडल्या. त्यानंतर मिक्का सिंगचा म्युझिक अल्बम ‘सावन मे लगी आग’च्या ‘बोलियां’ या गाण्यात, त्यांना काम करण्याची संधी मिळाली. स्मृती इराणी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक संकटांना तोंड दिले.