Join us  

धक्कादायक! पोटात दुखतंय म्हणून टॉयलेटमध्ये गेली विद्यार्थीनी; आणि दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:43 AM

Girl goes to toilet with stomach pain gives birth to baby : मासिक पाळी नेहमीच अनियमित असायची त्यामुळे पाळी कित्येक महिने न आल्यानं तिला काहीच जाणवलं नाही.

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा अनुभव असतो. पण अनपेक्षितपणे बाळाला जन्म दिलेल्या या तरूणीचे प्रकरण सध्या व्हायरल होत आहे.  युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनी रात्री बाहेर पडण्यापूर्वी टॉयलेटमध्ये गेली. यावेळी तिच्या पोटात तीव्रेतेनं वेदना होत होत्या. (Girl goes to toilet gives birth to baby) पुढे असं काही होईल याची तिला कल्पनाही नव्हती. अवघ्या २० वर्ष वयात तिनं बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे तिला ती प्रेग्नंट असल्याची कल्पनाही नव्हती. मासिक पाळीमुळे पोटदुखी उद्भवली असावी असं त्या मुलीला वाटलं. समोर आलेली धक्कादायक घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Girl goes to toilet with stomach pain gives birth to baby in uk)

द इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार डेव्हिस ही ब्रिस्टलमधील इतिहास आणि राजकारण या विषयाची विद्यार्थिनी आहे. ती सध्या युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टनमध्ये दुसऱ्या वर्षात आहे. तिला गर्भधारणेची कोणतीही स्पष्ट लक्षणे नव्हती आणि तिला बेबी बंपही नव्हते. तिनं दिलेल्या माहितीनुसार तिची मासिक पाळी नेहमीच अनियमित असायची त्यामुळे पाळी कित्येक महिने न आल्यानं तिला काहीच जाणवलं नाही. (Student gives birth in toilet while preparing for night out)

हृदयस्पर्शी! लग्नाच्या दिवशी दिवंगत वडिलांचा हुबेहूब पुतळा पाहून लेकीला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ

11 जून रोजी या तरूणीनं बाळाला जन्म दिला असून जन्माच्यावेळी या बाळाचे वजन  ३ किलो होते. डेव्हिसनं सांगितलं की,  "जेव्हा तिचा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता - मला वाटले की मी आधी स्वप्न पाहत आहे. मला तिचं रडणं ऐकू येईपर्यंत काय झालं ते कळलंच नाही. मला अचानक धक्क्यातून सावरायला आणि तिच्यासोबत जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आता मी ठीक आहे."

डेव्हिसनं म्हणाली, ''जून २०२२ मध्ये जेव्हा पोटात तीव्रतेनं वेदना होऊ लागल्या तेव्हा मला वाटलं की मासिक पाळी सुरू झाली असावी. मला चालताही येत नव्हतं, बेडवर झोपून राहणंही शक्य नव्हतं. दुसर्‍या दिवशी माझ्या वाढदिवसानिमित्तानं त्या रात्री मला घरी पार्टी करायची होती, म्हणून मी स्वत: ला बरे वाटण्याचा प्रयत्न करण्यासाठी आंघोळ केली पण वेदना आणखीच वाढल्या. नंतर मी टॉयलेटमध्ये  गेले अचानक पोटात खूप हालचाली जाणवू लागल्या. काय  होतंय मला कळतंच नव्हतं. मी एका बाळाला जन्म देत असेल याची मला कल्पनाही नव्हती बाळाचे रडणं ऐकल्यानंतर मी भानावर आले. नंतर मी माझा मित्र लिव्ह किंगला याबाबत सांगत माझ्या नवजात बाळाचा फोटो पाठवला त्यानंतर  किंगने रुग्णवाहिका बोलवण्याचा सल्ला दिला.''

रिपोर्टनुसार बाळाच्या जन्मानंतर डेव्हिसला प्रिन्सेस अॅन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाचा जन्म 35 आठवड्यांच्या गर्भावस्थेत झाला होता. आई आणि बाळ आता बरे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियागर्भवती महिलाप्रेग्नंसी