शाळेत वर्ग सुरू असताना शिक्षकांकडून चुकीचे प्रकार होणं काही नवीन नाही. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क प्राध्यापिकेचा कारनामा दिसून आला आहे. (Viral Video) अनेकदा शाळेचे प्राध्यापक, शिक्षक शाळेला पार्टिचे ठिकाण तर कधी ब्युटी पार्लर बनवतात. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शाळेची प्राध्यपक असलेली महिला फेशियल करून घेत आहे. (Unnao School Principal Did Facial During School Time Video Gone Viral On Social Media)
प्राथमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका संगीता सिंह या फेशियल करण्यात व्यस्त होत्या. तेव्हाच सहाय्यक शिक्षिका अनम खान यांनी मोबाईल कॅमेरा सुरू करत आत प्रवेश केला आणि हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (School Principal Did Facial During School Time)
In Unnao UP, Principal Sangita Singh of a primary school was enjoying facial during school timing in the kitchen of the school. When another teacher Anam Khan started making video of the same she bite her in both of her hands and then attacked her with a brick. Never mind all… pic.twitter.com/fctSCWPJN7
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) April 18, 2024
अनम खान कॅमेरा घेऊन संगिता यांच्या दिशेने जाताना दिसून येत आहे. यावेळी राग अनावर झाल्यानं संगीता यांनी अनम यांचा पाठलाग केला आणि त्यांना मारहाण करत हाताचा चावा घेतला. या व्हिडिओमध्ये अनम यांच्या हातांवर जखमेचें निशान दिसून येत आहे. दात चावल्याचे स्पष्ट व्रण पडले आहेत. हातातून रक्तस्त्रावही होत आहे.
व्हिटामीन बी -१२ साठी स्वस्तात मस्त सुपरफूड, हाडं होतील मजबूत-शाकाहारींसाठी वरदान
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार सहाय्यक शिक्षकाच्या तक्रारीवरून बीघापूर पोलिसांनी मेडीकल चाचणीच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. बीघापूर शाळेचे अधिकारी माया राय यांनी प्राध्यापिकेकडून घडलेल्या अनुचित प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.