Join us  

कायम खळबळ उडवणाऱ्या उर्फी जावेदला झाला आहे घशाचा आजार, ती म्हणते 'माझा आवाज गेला...'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 12:41 PM

Urfi Javed Throat Disease फॅशन सेंसेशन उर्फी जावेद आपल्या पोशाखामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिच्या आजाराची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

फॅशन सेंसेशन उर्फी जावेद आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ती अनेकदा सोशल मिडीयावर ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेत. सध्या तिची चर्चा आणखी एका कारणामुळे होत आहे. तिची तब्येत अचानक खालावली असून, तिच्या अजब आजाराची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. तिने या संदर्भात सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

उर्फी अल्पावधीतच नेटकऱ्यांच्या विश्वात प्रकाशझोतात आली. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र, तिने केलेल्या आजारासंबंधित पोस्ट पाहून नेटकरी आणि चाहत्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. उर्फीला 'लॅरिन्जायटीस' नावाच्या आजाराची लागण झाली. त्यामुळे तिला दुबईत नीट फिरता आले नाही. सध्या तिला आराम करण्यास सांगितले आहे. उर्फीने चाहत्यांसाठी एक पोस्ट लिहिली, 'माझा अर्धा खर्च तर या आजारातून बरा होण्यात खर्च झाला'. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत उर्फीला तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले.

दुबईमध्ये अचानक तब्येत खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनेक तपास केल्यानंतर तिला 'लॅरिन्जायटीस' झाल्याचे निदान झाले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून, तिला बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. 

'लॅरिन्जायटीस' हा आजार नेमका आहे तरी काय ? त्याची लक्षणे काय ?

'लॅरिन्जायटीस' हा आजार म्हणजे घशात होणारी जळजळ, सूज येणे आणि इन्फेक्शन. याचा त्रास अधिक जाणवू लागला की, कालांतराने आवाज देखील खराब होऊ लागतो, आणि हळू हळू आवाज ओळखणंही येणं कठीण होऊन जातं. हा आजार गंभीर नाही, पण त्यावर योग्य वेळी उपचार घेतले नाही तर गंभीर समस्य उद्भवू शकते.

2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फीला  बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीच्या  सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर  3.9M  मिलियनपेक्षा जास्त  फॉलोअर्स आहेत. 

टॅग्स :दुबईआरोग्यसोशल व्हायरल