Join us  

निषेध! असं म्हणत उर्वशी रौतेलाने कापून टाकले स्वत:चे केस.. कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 5:06 PM

उर्वशी रौतेला हे कायम वादात आणि चर्चेत असलेलं नाव, यावेळी मात्र उर्वशीने एक भूमिका घेत जगजाहीर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

ठळक मुद्देआता या नव्या पोस्टनंतर काय वाद होतात नाही होत हे बघायचं..

उर्वशी रौतेला हे तसंही कायम चर्चेत असलेलं नाव. क्रिकेटचे सामने सुरु असले की ती जास्तच चर्चेत असते. ऋषभ पंत आणि तिचं असलेलं/नसलेलं प्रेमप्रकरण, तिनं त्याचा पाठलाग करणं न करणं हे सारं बातमीचा विषय होतं. यावेळीही उर्वशी बातमीचाच विषय आहे मात्र कारण वेगळं आहे. तिनं आपले केस कापून टाकत निषेध नोंदवला आहे. तो ही जाहीरपणे. मात्र तो निषेध बाकी कुणाचा नाही तर इराण सरकारचा आहे.

(Image : google)

उर्वशीने आपला एक पाठमोरा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यासोबत एक मोठी पोस्ट आहे. त्यात उर्वशी म्हणते की, इराणी महिलांच्या हिजाब विरोधी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी माझे केस कापते आहे. इराणी पोलिसांच्या कस्टडीत माशा अमिनीचा मृत्यू झाला त्यानंतर इराणभर हिजाबविरोधी आंदोलन सुरु आहे. जगभरातील महिला त्याला पाठिंबा देत आहेत. जगभरात बायका आपले केस जाहीरपणे कापून हे सांगत आहेत की तुमच्या सौंदर्याच्या प्रतीकांशी आम्ही घेणंदेणं नाही. आम्ही त्यांची पर्वा करत नाहीत. केस हे महिलांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते तर तेच केस जाहीरपणे कापून टाकत महिला हेच सांगत आहेत की अशा प्रतीकांची गरज नाही आणि महिलांनी कोणते कपडे परिधान करावे कोणते करु नयेत हे समाजानं ठरवू नये. बायकांनी कसं जगावं, कसं वागावं हे इतरांनी सांगू नये. आता बायका एकत्र येत आहेत आणि आपले प्रश्न मांडत आहेत. प्रश्न कुणा एका देशातल्या बाईचा नाही तर जगभरातल्या बायकांचा आहे. स्त्रीवादाचा जगभरात लढण्याची नवी ताकद मिळत आहे.’ या पोस्टसह उर्वशी म्हणते आहे की, रिस्पेक्ट वूमन. महिलांचा आदर करा. त्यासोबत तिनं आपले पाठमोरे फोटोही शेअर केलेत. उर्वशी रौतेला हे कायम वादाच्या भोवऱ्यात असलेलं नाव, आता या नव्या पोस्टनंतर काय वाद होतात नाही होत हे बघायचं..

टॅग्स :उर्वशी रौतेला