Join us  

काय सांगता! एकाच दिवशी संपूर्ण फॅमिलीचा बर्थ डे, आईबाबा आणि जुळ्या मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 5:16 PM

US couple welcomes twins on the day they both were born जोडप्याला लागली लॉटरी! एकाच दिवशी संपूर्ण फॅमिलीचा बर्थ डे, कपल्सच्या वाढदिवसानिमित्त झाला जुळ्या मुलांचा जन्म

जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हाती नसते. कोणाचा कधी जन्म होईल, तर कोणाचा कधी मृत्यू होईल हे सांगता येत नाही. मृत्यू हे आपल्या हाती नसते, पण जन्माची तारीख किंवा महिना हे ठरवून करण्याच्या प्रयत्नात लोकं असतात. अमेरिकेतील अशाच एका जोडप्याला त्यांच्याच वाढदिवसानिमित्त जुळी मुलं झाली आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? ३१ वर्षीय सायरा ब्लेअर आणि ३२ वर्षीय जोस एर्विन या जोडप्याला १८ ऑगस्ट रोजी, एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं झाली. त्यांच्या या जन्मामुळे संपूर्ण अमेरिकेला आनंद तर झालाच आहे, व सोशल मिडीयावर यांचीच चर्चा होत आहे(US couple welcomes twins on the day they both were born).

क्लीव्हलँड क्लिनिक हिलक्रेस्ट रुग्णालयाने यासंदर्भातील माहिती, आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'काहीही शक्य आहे! आई - वडील आणि त्यांच्या नवजात मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. व त्यांच्या गोड, निरोगी बाळांसाठी अभिनंदन!'

स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब

पिपल या वेबसाईटनुसार, 'बाळांचा जन्म २८ ऑगस्ट रोजी होणार होता. मात्र, १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ : ३० वाजताच्या दरम्यान, प्रसूतीपूर्व तपासणी केली असता, एका बाळाचा पाय, गर्भाशयाच्या बाहेर आल्याचे निदर्शनास आले. गुंतागुंत टाळण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. त्यानंतर दोन गोड मुलांचा जन्म झाला.'

माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला..

युजर्सने कमेंट करत दिल्या शुभेच्छा

व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या. एकाने कमेंट करत लिहिले की, 'हा दिवस बिग पार्टी आयोजित करून साजरा करा', तर दुसऱ्याने 'संपूर्ण फॅमिलीला हॅपी बर्थ डे'. तर तिसऱ्याने 'आता कोणाचाच कोणी बर्थ डे तुम्ही विसरू शकणार नाही, कारण एकाच दिवशी सगळ्यांचाच बर्थ डे साजरा होईल'. सध्या ही पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून, अनेकांनी कमेंट करत कौतुकाचं वर्षाव केला आहे.

टॅग्स :अमेरिकाअमेरिकासोशल मीडियासोशल व्हायरल