फॅशन जगतात दररोज हटके स्टायलिस्ट ट्रेण्ड पाहायला मिळतात. तसेच नवनवीन फॅशन डिझायनर्सही (Fashion Designer) नवनवे प्रयोग करत हटके आणि नवीन आऊटफिट्स तयार करतात. काही ड्रेस हे दिसायला फार आकर्षक असतात, तर काही ड्रेस हे त्याच्या डिझाईनमुळे खूप युनिक दिसतात. फॅशन डिझायनर्स रोज नवीनवीन प्रयोग कपड्यांवर करत असतात. असाच एक आगळा-वेगळा प्रयोग एका फॅशन डिझायनरनं केलाय. या डिझायनरने चक्क एक्स्पायर्ड कंडोमचा (Expired Condoms Dress) वापर करत गाऊन तयार केला आहे.
या फॅशन डिझायनरच्या अनोख्या प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. परंतु, एक्स्पायर्ड कंडोमचा वापर करीत त्याने ड्रेस शिवला कसा? (Social Viral) याला ही भलतीच आयडिया सुचली कुठून? हा ड्रेस तयार करण्यामागचा त्याचा हेतू काय? पाहूयात(US Designer Crafts A Stunning Dress Out Of Expired Condoms, Internet Buzzes With Reactions).
एक्स्पायर्ड कंडोमचा ड्रेस कधी पाहिलाय का?
आजकाल फॅशन डिझायनर कापडाचा वापर कमी पण, इतर गोष्टींचा वापर करून ड्रेस तयार करतात. आपली कला आणि बुद्धीचा पुरेपूर वापर करून हटके आणि आकर्षक ड्रेस शिवतात. पण एका फॅशन डिझायनरनं लाईट्स किंवा इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करुन नाहीतर, चक्क कंडोमचा वापर करीत गाऊन तयार केलाय. पण त्याने हा ड्रेस उगाच मनात आलं म्हणून शिवला नसून, त्यामागे डिझायनरचा हेतू आहे.
गुन्नार डेथरेज या विदेशी फॅशन डिझायनरनं कंडोम वापरुन सुंदर गाऊन तयार केला आहे. हा गाऊन तयार करतानाचा व्हिडिओ त्याने युट्यूबवर शेअर केला आहे. लैंगिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यानं एक्सपायर्ड कंडोमचा वापर करून गाऊन डिझाइन केला असल्याचं त्याने म्हटलंय.
''मी कंडोमपासून गाऊन तयार केलाय. तो खरंच फार सुंदर आहे", असं डेथरेजनं युट्यूबवर व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये फॅशन डिझायनरनं कंडोमला फुलांचा आकार दिला आहे. त्यावर गोल्डन कलरही दिला आहे. त्याने ब्लॅक नेटवर हे कंडोम स्टीच केले असून, पूर्ण गाऊन तयार झाल्यानंतर तो गाऊन खूप आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.
१० रुपयांच्या प्लास्टिक बॉटलने सोला किलोभर लसूण, लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोपं
फॅशन डिझायनरनं १ डिसेंबर जागतिक एड्स डेच्या निमित्तानं, कंडोम गाऊन तयार केला होता. सध्या सोशल मीडियावर कंडोम गाऊनचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक युजर्स फॅशन डिझानरवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने 'किती सुंदररित्या त्याने या ड्रेसद्वारे जागरूकता पसरवली.' तर दुसऱ्या युजरने 'जगात टॅलेण्टची कमतरता नाही' असं म्हटलंय.