Lokmat Sakhi >Social Viral > ३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले, आरोपही फेटाळले- परदेशी महिलेला भारतीय सराफाने ' असा ' घातला गंडा

३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले, आरोपही फेटाळले- परदेशी महिलेला भारतीय सराफाने ' असा ' घातला गंडा

US woman buys jewellery for Rs 6 crore, later discovers it is fake and worth Rs 300 : परदेशी महिलेची भारतीय सराफाकडून फसवणूक; ३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 01:11 PM2024-06-12T13:11:08+5:302024-06-12T15:24:36+5:30

US woman buys jewellery for Rs 6 crore, later discovers it is fake and worth Rs 300 : परदेशी महिलेची भारतीय सराफाकडून फसवणूक; ३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले..

US woman buys jewellery for Rs 6 crore, later discovers it is fake and worth Rs 300 | ३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले, आरोपही फेटाळले- परदेशी महिलेला भारतीय सराफाने ' असा ' घातला गंडा

३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले, आरोपही फेटाळले- परदेशी महिलेला भारतीय सराफाने ' असा ' घातला गंडा

परदेशी पाहुण्यांची भारतात फसवणूक होण्याचे प्रकार आपण पहिलेच असतील (Fake Jewellery). भारतातील अनेक भागात अशा प्रकारच्या घटना घडत असतात (US Women). असाच काहीसा प्रकार जयपूरमध्ये घडला आहे. एका दुकानदाराने ३०० रुपयांचे दागिने तब्बल ६ कोटींना विकले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या चेरीश यांनी जोहरी बाजारातून दागिने खरेदी केले होते (Social Viral). या दागिन्यांची किंमत ६ कोटी रुपये सांगण्यात आलं.

चेरिश यांनी हा दागिन्याचा तुकडा विकत घेतला आणि अमेरिकेतील एका प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवला. परंतु, या प्रदर्शनात हा तुकडा बनावट असल्याचं सिद्ध झालं. दुकानदाराने बनावट विक्री तर केलीच, उलट दागिना बनावट असल्याचा दावाही फेटाळून लावला. नेमकं प्रकरण काय? पाहूयात(US woman buys jewellery for Rs 6 crore, later discovers it is fake and worth Rs 300).

नक्की प्रकरण काय?

अमेरिकेत राहणाऱ्या चेरीश हे भारतात काही दिवसांसाठी भ्रमंतीसाठी आल्या होत्या. यादरम्यान, त्यांनी जयपूरच्या जोहरी बाजारातून ६ कोटींचे दागिने खरेदी केले होते. त्यांनी हा दागिना अमेरिकेतील एका प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवला. परंतु, तेथे हा दागिना बनावट असल्याचं सिद्ध झालं.

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

दुकानदाराने केली खोटी तक्रार

दागिना बनावट असल्याचं समोर आल्यानंतर चेरीश पुन्हा भारतात परतली. ज्या दुकानातून तिने दागिना विकत घेतला, तेथे ती गेली आणि तक्रार केली. तक्रारीकडे दुकानदाराने दुर्लक्ष केले. या दुकानाचे मालक राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांनी दागिना बनावट असल्याचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे चेरिशने मानक चौक पोलीस ठाण्यात दुकानमालकाविरोधात तक्रार दाखल केली. परंतु, दुकान मालकाने तिच्याचविरोधात खोटा गुन्हा दाखल केला.

बनावट दागिन्यांचा पर्दाफाश

यानंतर चेरीशला काय करावं, सुचलं नाही. तिने तात्काळ अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधला, आणि त्यानंतर तपासाची चक्रे फिरली, आणि काही दिवसातच हे दागिने बनावट असल्याचं समोर आलं. दरम्यान, दुकान मालक आणि त्यांचा मुलगा सध्या फरार आहेत. तर दागिन्यांसाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पिवळ्या दातांमुळे मनमोकळं हसता येत नाही? बेकिंग सोड्याचा करा असरदार उपाय- दात दिसतील स्वच्छ

उत्तर पोलिस उपायुक्त बजरंगसिंग शेखावत यांनी सांगितलं की, 'आरोपींनी ३०० रुपये किमतीचे सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने चेरीशला विकले. तिला सत्यतेचे बनावट प्रमाणपत्र दिले. बनावट प्रमाणपत्र जारी करणाऱ्या नंद किशोरला अटक करण्यात आली असून, फरार पिता-पुत्राचा शोध सुरू आहे.'

Web Title: US woman buys jewellery for Rs 6 crore, later discovers it is fake and worth Rs 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.