Join us  

२५ वर्षीय महिलेनं प्रेग्नंसीनंतर ६० किलो वजन घटवलं; हे ट्रांस्फॉर्मेशन तिनं केलं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:00 PM

US womans unbelievable weight loss transformation : सारा लॉकेट नावाची महिला मुलासह स्लाईडवर खेळत असताना अडकली आणि तिला अपमानास्पद प्रसंगाचा सामना करावा लागला.

आपलं वजन नियंत्रणात राहावं आपण मेटेंन दिसावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. यूएस मधील वॉशिंग्टन डीसी मधील एका 25 वर्षीय महिलेने  ६० किलो वजन कमी करून वजन घटवण्यास इच्छूक असलेल्यांना प्रेरणा दिली आहे. प्रेग्नंसीनंतर अनेक महिलाचं वजन वाढतं आणि त्यांना नैराश्य येतं. पण  नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेऊन तुम्ही वजन कमी करू शकता. 

सारा लॉकेट नावाची महिला मुलासह स्लाईडवर खेळत असताना अडकली आणि तिला अपमानास्पद प्रसंगाचा सामना करावा लागला. यावेळी तिनं वजन कमी करण्याचा निर्धार केला. साराने 60 किलोपेक्षा जास्त वजन कमी करण्यासाठी गॅस्ट्रिक स्लीव्ह सर्जरी करून तिचे आयुष्य पुन्हा रुळावर आणले. (US womans unbelievable weight loss transformation will make your jaw drop read her inspiring story)

ती सांगते “एकदा माझा मुलगा स्वतःच स्लाइडवरून खाली जायला खूप घाबरत होता आणि आम्ही एकत्र जावे अशी त्याची इच्छा होती, म्हणून, मी त्याच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा स्लाइडने वळण घेतले तेव्हा मी अडकले आणि जाऊ शकले नाही. त्यावेळी मला खूप अपमानास्पद भावना वाटली. यादरम्यान ऑपरेशन केल्यानंतर १० महिन्यांनी मी व्यवस्थित आयुष्य जगू लागले.''

गरोदरपणात खाण्यावर नियंत्रण न ठेवल्यानं तिची स्थिती अशी झाली. तिला एक ४ वर्षांची  आणि २ वर्षांची मुलगी आहे. सारा म्हणाली की तिला प्रीक्लेम्पसिया आणि गर्भधारणा मधूमेह आहे काही वेळातच सारानं  ३ हजारांपेक्षा जास्त कॅलरीज कमी केल्याचं दिसून आलं. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, सारा म्हणाली, “माझी सप्टेंबर 2021 मध्ये शस्त्रक्रिया झाली आणि सुदैवाने, माझ्या विम्याने त्यातील 98% पैसे दिले. या शस्त्रक्रियेबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना होत्या. मी खूप उत्साही होते. पण मला माहित होते की हा एक मानसिक प्रवास असेल जिथे मला माझी जीवनशैली आणि अन्नाशी असलेले माझे नाते संतुलित करण्यासाठी काम करावे लागेल.”

टॅग्स :फिटनेस टिप्ससोशल व्हायरल