जेव्हा बाजारात खूप लिंबू येतात तेव्हा स्वस्त मिळत असल्याने आपण ती भरपूर घेऊन ठेवतो. पण बऱ्याचदा आपल्याकडून लिंबाचा एवढा उपयोग केला जात नाही. सगळी लिंबू वापरली जात नाहीत. त्यामुळे मग काही लिंबू खराब होतात. त्यांना लालसर चॉकलेटी रंग येऊ लागतो. मग ती खराब झाली, सुकली, वाळली म्हणून आपण टाकून देतो. पण असं करू नका. कारण पितळेची भांडी किंवा जळकट तवा- कढई स्वच्छ करण्यासाठी हे लिंबू खूप उपयुक्त ठरतात (Use of dried lemon). त्याचा कसा उपयोग करायचा ते आता आपण पाहूया.(cleaning kadhai, pan, copper and brass utensils.)
हा उपाय इंस्टाग्रामच्या goblet_honey या पेजवर शेअर करण्यात आला आहे. भांडी स्वच्छ करण्यासाठी जर आपल्याला लिंबाचा उपयोग करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इतर ३ गोष्टी लागणार आहेत.
त्या म्हणजे चहा झाल्यानंतर भांड्यात उरलेली चहा पावडर, एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा. या चार पदार्थांची एकत्रित जादू आपली भांडी लख्ख करण्यासाठी होऊ शकते.
भांडी स्वच्छ करण्यासाठी वाळलेल्या लिंबांचा उपयोगयासाठी सगळ्यात आधी प्रत्येक लिंबाच्या साधारण ४- ४ फोडी करून घ्या. एका पातेल्यात २ ग्लास पाणी तापवायला ठेवा. त्यामध्ये लिंबाच्या फोडी आणि चहा पावडर टाका. पाणी गरम झालं की मीठ टाका.
शिल्पा शेट्टी म्हणते हिंमत असेल तर स्वीकारा माझे फिटनेस चॅलेंज? बघा, किती आहात फ्लेक्झिबल..
या सगळ्या मिश्रणाला उकळी आली की त्यात बेकिंग सोडा टाका आणि मग गॅस बंद करा. आता हे मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हा ते गाळून घ्या आणि एका बाटलीमध्ये भरून ठेवा. पितळाची भांडी, काळपट पडलेलं गॅस बर्नर, जळालेला तवा- कढई किंवा इतर जळकी भांडी असं सगळं स्वच्छ करण्यासाठी या पाण्याचा खूप चांगला उपयोग करता येईल.