Lokmat Sakhi >Social Viral > कपाटात जुन्या कपड्यांची गर्दी? किचनसाठी करा त्यांचा असा वापर, अनेक गोष्टी राहतील चकाचक

कपाटात जुन्या कपड्यांची गर्दी? किचनसाठी करा त्यांचा असा वापर, अनेक गोष्टी राहतील चकाचक

Use of old clothes for kitchen cleaning : जुन्या कपड्यांचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकतो, ते कसे करावे पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 06:09 PM2023-10-04T18:09:43+5:302023-10-04T18:10:51+5:30

Use of old clothes for kitchen cleaning : जुन्या कपड्यांचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकतो, ते कसे करावे पाहा.

Use of old clothes for kitchen cleaning | कपाटात जुन्या कपड्यांची गर्दी? किचनसाठी करा त्यांचा असा वापर, अनेक गोष्टी राहतील चकाचक

कपाटात जुन्या कपड्यांची गर्दी? किचनसाठी करा त्यांचा असा वापर, अनेक गोष्टी राहतील चकाचक

घरातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. तिचा पुरेपूर वापर भारतीय लोकं करतात. मुख्य म्हणजे भारतीय लोकं खूप जुगाडू असतात. त्यांना कोणत्याही जुन्या गोष्टीचा वापर पुन्हा कशा पद्धतीने करता येईल याची कल्पना असते. मग ती रिकामी पाकिटे असोत, किंवा मग जुन्या वस्तू. कपडे देखील जुने झाल्यानंतर त्याचा वापर पुन्हा कशासाठी करता येईल, यासाठी अनेक जण शक्कल लढवतात.

जर आपण जुने कपडे निरुपयोगी म्हणून फेकून देण्याच्या विचारात असाल तर, असे करू नका. याचा वापर किचनच्या अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. जुन्या कपड्यांचा वापर किचनच्या कामांसाठी कशा पद्धतीने करता येईल, पाहूयात(Use of old clothes for kitchen cleaning).

फ्रिज हँडल कव्हर

जुन्या कपड्यांचा वापर करून आपण फ्रिजच्या हँडलसाठी कव्हर तयार करू शकता. अनेकदा फ्रिजचे हँडल लवकर चिकट खराब होते. फ्रिजचं दार उघडताना आपण हँडलचा वापर करतो. जर फ्रिजचे हँडल लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर, जुन्या कपड्यांचा वापर करून स्टायलिश फ्रिज हँडल कव्हर तयार करा. फ्रिजच्या हँडलचे माप घेऊन, रंगीबेरंगी कापड घेऊन आपण फॅन्सी हँडल कव्हर तयार करू शकता.

देवघर कळकट-चिकट झाले? १ चमचा बेकिंग सोडा, देवघर उजळेल लख्ख

फ्रिज कव्हर

धुळीमुळे किंवा खराब हातांमुळे फ्रिज बाहेरून कळकट-चिकट होते. फ्रिजला झाकण्यासाठी आपण जुन्या कपड्यांचा वापर करून फॅन्सी कव्हर तयार करू शकता. महागडे कव्हर आणण्यापेक्षा घरीच कव्हर आपण तयार करू शकता. यासाठी फ्रिजच्या मापानुसार विविध रंगाचे कापड एकत्र शिवून फ्रिज कव्हर तयार करा. यामुळे फ्रिजची बॉडी लवकर खराब होणार नाही.

पहिलं लग्न मोडलं, पदरात मुलगा, डिप्रेशन-अफेअरचे गॉसिप, वाचा स्टारडमपलिकडची माहिरा खानची एकाकी कहाणी

किचन साफ करण्यासाठी उपयुक्त

किचनच्या अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी, आपण जुन्या कपड्यांचा वापर करू शकतो. कपबर्ड असो किंवा ट्रोली अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपण जुन्या कपड्यांचा वापर करू शकतो.

Web Title: Use of old clothes for kitchen cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.