Join us  

चिकट-कळकट डबे घासण्यासाठी वापरा चहा पावडर, हा घ्या झटपट सोपा उपाय- डबे दिसतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 5:46 PM

Used Tea powder to scrub sticky stains from utensils स्टिलचे डबे, काचेची भांडी घासण्यासाठी सोपी ट्रिक, चहा करुन पावडर फेकू नका..

प्रत्येक महिलेसाठी घरातील किचन हा महत्वपूर्ण भाग असतो. किचन सावरण्यासाठी ती दिवसरात्र मेहनत घेत असते. किचनची साफ सफाई करण्यासाठी ती अनेक ट्रिक्स फॉलो करते. घरातील इतर खोल्यांपेक्षा स्वयंपाक घर अधिक अस्वच्छ असते. कारण स्वयंपाक घरात जेवण बनवले जाते. जेवण बनवत असताना फोडणीचे डाग भांडी, डबे आणि लाद्यांवर पडते. ते डाग साफ करताना नाकी नऊ येतात.

किचनमध्ये जास्त डबे घाण होतात. डबे घासताना तासंतास त्यातच मोडतो. आपण डबे घासण्यासाठी उरलेल्या चहापत्तीचा वापर करू शकता. चहापत्तीचा वापर करून आपण डब्ब्यांवरील चिकटपणा सहज काढू शकता. यासह काचेच्या भांड्यांना देखील नवी चमक देऊ शकता.

डब्ब्यांवरील चिकटपणा घालवण्यासाठी चहापत्ती करेल मदत

सर्वप्रथम, उरलेल्या चहापत्तीला पुन्हा एकदा उकळून घ्या. आता या चहाच्या तयार पाण्यात लिक्विड डिशवॉशर टाका. आपण या तयार डिशवॉशरने डबे घासून काढू शकता. याने डब्ब्यांवरील चिकटपणा दूर होईल. यासह ते नव्यासारखे दिसतील. या पाण्याने आपण इतर भांडे देखील घासू शकता.

काचेची भांडी घासण्यासाठी उपयुक्त

काचेची भांडी दीर्घकाळ ट्रोलीच्या आत राहिल्यामुळे चिकट होतात. काचेची भांडी घासताना मनात भीती निर्माण होते की, भांडी आपल्या हातून फुटणार तर नाही ना? मात्र, आपण काचेची भांडी सोप्या पद्धतीने झटपट घासून काढू शकता. उरलेल्या चहापत्तीला पुन्हा उकळून घ्या. त्या पाण्यात लिक्विड डिशवॉशर टाका. आणि त्या पाण्यात काचेची भांडी घासून घ्या. याने काचेची भांडी चकचकीत निघतील.

टॅग्स :किचन टिप्सहोम रेमेडी