Toilet Smell : टॉयलेटमधील दुर्गंधीमुळे सगळेच वैतागलेले असतात. अनेक तर दुर्गंधी इतकी जास्त येते की, टॉयलेटचा वापर करणंही अवघड होतं. अशात जर कुणी पाहुणे घरी आले तर त्यांच्यासमोर फजिती होते. आजकाल बिझी शेड्युलमुळे टॉयलेटची रोज स्वच्छताही करता येत नाही. अशात स्वच्छता न करता टॉयलेटमधील दुर्गंधी पळवण्याचा एक उपाय आहे.
जर तुम्हाला टॉयलेटची दुर्गंधी झटक्यात दूर करायची असेल तर लिंबूची एक ट्रिक वापरू शकता. जर हा उपाय तुम्ही केला तर आठवडाभर टॉयलेट सीट स्वच्छ केली नाही तरी दुर्गंधी येणार नाही. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा उपाय करण्यासाठी ना जास्त खर्च येत ना जास्त वेळ लागत. यासाठी फक्त तुम्हाला एक लिंबू, सर्जिकल मास्क आणि कात्री हवी.
मास्कमध्ये लिंबू टाकण्याची ट्रिक
टॉयलेट सीटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबू आणि मास्कची ट्रिक वापरायची आहे. सगळ्यात आधी लिंबाचे छोटे छोटे तुकडे करा. मास्क एका बाजूने कापून घ्या. नंतर मास्कच्या आतल्या बाजूत लिंबाचे तुकडे टाका. मास्कचं एका बाजूने उघडं राहिलेलं तोंड धाग्याने बांधून घ्या.
जेव्हा मास्कच्या आत लिंबाचे तुकडे टाकले जातील आणि एका बाजूने मास्कचं तोंड बांधाल तेव्हा ते एका पॅकेटसारखं दिसेल. हे पॅकेट फ्लश टॅंकच्या आता पाण्यात बुडेल अशा स्थितीत लटकवायचं आहे. याने लिंबातील अॅसिड फ्लश टॅंकमध्ये मिक्स होईल. अशात जेव्हाही तुम्ही फ्लश कराल, लिंबाच्या अॅसिडने टॉयलेट सीट क्लीन होईल आणि दुर्गंधीही दूर होईल.