Join us  

खिडक्यांच्या जाळ्या धुळीने माखल्या? १ जबरदस्त ट्रिक; जाळ्या होतील स्वच्छ-दिसतील नव्यासारख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 5:22 PM

Use This Trick to Clean Window Screens in Minutes : आता जाळ्या साफ करणे झाले सोपे, फक्त साफ करताना काही गोष्टींची काळजी घ्या..

घरात डास किंवा कबुतरे येऊ नये म्हणून आपण खिडक्यांबाहेर जाळी (Window Cleaning Tips) लावतो. जाळ्यांमुळे घरात हवा खेळती राहते. शिवाय डास आणि कबुतरांचा त्रासही होत नाही. पण बऱ्याचदा खिडक्या साफ करण्यापेक्षा जाळ्या साफ करणे अवघड काम वाटते. घराची स्वच्छता करताना आपण खिडक्यांचा काचा स्वच्छ करतो. पण जाळ्या साफ करणे तसं अवघड काम. जाळ्यांवर बऱ्याचदा धूळ साचते (Cleaning Tips). ज्यामुळे ती साफ करणे कठीण होऊन जाते.

जाळ्यांवर धूळ जमा झाल्यामुळे अधिक धूळ हवेसोबत घरात शिरते. ज्यामुळे घर देखील अस्वच्छ होते (Home Clean). घरातील सदस्यांना धुळीचा त्रास होतो तो वेगळा. जर आपल्याला जास्त मेहनत न घेता जाळ्या साफ करायच्या असतील तर, या काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्सच्या मदतीने जाळ्या साफ करणं सोपं होईल(Use This Trick to Clean Window Screens in Minutes).

जाळ्या साफ करण्यासाठी लागणारं साहित्य

खिडकीत लावलेली मच्छरदाणी स्वच्छ करण्यासाठी आपल्या,

व्हिनेगर

बेकिंग सोडा

पाणी

स्प्रे बॉटल

गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड

कापड

क्लिनिंग ब्रश

हायड्रोजन पेरॉक्साइड

हेअर ड्रायर

अशा पद्धतीने स्वच्छ करा जाळ्या

मच्छरदाणी साफ करण्यापूर्वी, क्लिनिंग स्प्रे तयार करा. यासाठी एका भांड्यात दोन ते तीन कप पाणी घ्या. त्यात दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड, व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर या पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करा. हवं असल्यास आपण त्यात लिंबाचा रस देखील घालून मिक्स करू शकता. पाण्यात साहित्य मिक्स केल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा, आणि बाटली काही वेळ नीट हलवा जेणेकरून मिश्रण चांगले मिसळेल.

खिडकीतील मच्छरदाणी कशी स्वच्छ करावी

नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

पहिले जाळ्या कापडाने स्वच्छ करा जेणेकरून अतिरिक्त घाण आणि धूळ निघून जाईल. कापडाने साफ केल्यानंतर, जाळीवर स्प्रे बॉटलमधील तयार पाणी फवारावा. फवारणी केल्यानंतर काही वेळ तसेच ठेवा. नंतर क्लिनिंग ब्रशच्या मदतीने जाळी घासून काढा. नंतर पाण्याने जाळी स्वच्छ करा. पाणी सुकवण्यासाठी आपण हेअर ड्रायरची मदत घेऊ शकता. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल