Join us  

जुन्या पुराण्या टूथपेस्ट फेकू नका, चमचाभर टूथपेस्टने बाथरुम होऊ शकतं चकाचक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 2:13 PM

Use Toothpaste to Clean Bathroom बाथरुम स्वच्छतेसाठी आपण चमचाभर टू‌थपेस्टचा इनोव्हेटिव्ह वापर करु शकतो.

बाथरूमला नियमित साफ न केल्यामुळे ते लगेच खराब होतात. फरशी व इतर जागांवरील काळपट सहसा लवकर निघत नाही. बाथरूम साफ करण्यासाठी आपण विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतो. बाजारात हे प्रॉडक्ट्स सहजरित्या मिळतात. काही प्रॉडक्ट्स बाथरूम योग्यरित्या क्लिन करतात, तर काही नाही.

या महागड्या क्लिनिंग प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा टूथपेस्टचा वापर करून पाहा. याच्या वापरामुळे बाथरूममधील अनेक वस्तू झटपट क्लिन होतील. या घरगुती सोप्या हॅकमुळे बाथरूम चकाचक दिसेल. चला तर मग बाथरूम साफ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर कसा करता येईल, याच्या वापरामुळे बाथरूम चकाचक कसे दिसेल हे पाहूयात(Use Toothpaste to Clean Bathroom).

टूथपेस्टने करा टाईल्सची सफाई 

बाथरूमच्या टाइल्स साफ न केल्यास लगेच घाण होतात. टाइल्सवरील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यात टूथपेस्ट घालून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट टाइल्सवर लावा, व स्क्रबरच्या मदतीने घासा. काही वेळ घासल्यानंतर फरशी स्वच्छ पाण्याने धुवा.

घामामुळे पांढरे सॉक्स काळेकुट्ट झालेत? ५ घरगुती उपाय, सॉक्स दिसतील नव्यासारखे पांढरेशुभ्र

तुटलेल्या भिंती दुरुस्त करा

टूथपेस्ट बाथरूमची खराब भिंत दुरुस्त करण्यास मदत करेल. बाथरूमच्या भिंतींना छोटी मोठी छिद्रे पडतात. जी दिसायला विचित्र - खराब दिसतात. हे छिद्र टूथपेस्टने भरा व कोरडी होऊ द्या. असे केल्याने छिद्र बंद होतील, जे पाहिल्यानंतर वाईट दिसणार नाही.

मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

नळाची सफाई करा

बाथरूमचा नळ साफ करण्यासाठी व्हिनेगर आणि टूथपेस्टचा वापर करा. दोन्ही गोष्टी एकत्र करून मिश्रण तयार करा, व ही पेस्ट नळावर लावा. व ब्रश किंवा स्क्रबरने घासा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. यामुळे नळ पुन्हा नव्यासारखे चमकेल. आपल्याकडे जर व्हिनेगर उपलब्ध नसेल तर, लिंबाचा रस देखील वापरू शकता.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल