भारतातील प्रत्येक घरातील लोकांच्या सकाळची सुरूवात चहानेच होते. चहा, कॉफी घ्यायला आवडत नाही असे मोजकेच लोक असतात. (Home Tips and Tricks) रोज चहा गाळल्यानंतर वापरलेली चहा पावडर फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहीत आहे ही वापरलेली चहा पावडर तुमची रोजची कामं सोपी करू शकते. (Amazing uses of used tea leaves) निरूपयोगी समजून चहा गाळल्यानंतर पावडर आपण फेकून देतो. या लेखात तुम्हाला चहा पावडरचा वापर वेगळ्या पद्धतीनं कसा करता येईल. याबद्दल सांगणार आहोत. (Used Tea Leaves Uses)
1) उरलेल्या चहा पावडरपासून बनवा डिओडराईजर
जर घराच्या कोणत्याही भागात जास्त वास येत असेल किंवा पावसाळ्यात ओलसरपणाची समस्या जास्त त्रास देत असेल तर तुम्ही वापरलेली चहाची पाने वापरू शकता. चहाची पाने खूप चांगली डिओडरायझर म्हणून काम करू शकतात.
सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये किचन टिश्यू टाकून ओल्या चहाची पाने वाळवा. ते चांगले सुकल्यावर मलमल किंवा सुती कापडात बांधून ठेवा. आता या पिशवीत सुगंधी तेलाचे काही थेंब टाका. जिथे वास येतो तिथे ठेवा. चहाची पाने खूप उपयुक्त ठरतील.
2) साफ सफाईसाठी वापर
तुम्ही उरलेली चहाची पाने घर स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता कारण ते कोणत्याही पृष्ठभागावरील चिकटपणा काढून टाकण्यासाठी खूप चांगले आहे. सर्व प्रथम ती पानं कोरडी करा. त्यानंतर चॉपिंग बोर्ड, घाणेरडी भांडी, खिडक्या इत्यादी... जे काही साफ करायचे असेल तिथे वापरा आणि कापडाने किंवा स्क्रबरने घासून घ्या. भांडी साफ करण्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो.
3) गार्डनिंग
चहाच्या पानांचा वापर बागकामासाठीही करता येतो. यामुळे चांगले खत बनवता येऊ शकते. चहाच्या पानांनी चांगले फर्टिलायजर बनवता येऊ शकते. फक्त चहा बनवताना तुम्ही जास्त साखर घातली असेल तर ते झाडांच्या मुळांना नुकसान पोहोचवू शकते.
लेकाच्या हट्टामुळे आईनं जेवण बनवताना गाणं गाणलं; माऊलीच्या जबरदस्त आवाजानं लोकांना वेड लावलं
वापरलेली चहाची पाने (साखर नसलेली) वाळवून रोपांच्या मातीजवळ ठेवा, तण वाचवण्यास मदत होते. जर तुम्हाला कंपोस्ट बनवण्याची आवड असेल तर याचा वापर करता येईल. उकळलेल्या चहाचे पाणी थंड करून झाडांना देता येते. त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते.