बर्याचदा भाज्या सोलून जेवणासाठी वापरल्या जातात. भाज्यांप्रमाणेच अशी अनेक फळे आहेत जी सोलल्यानंतरच खायला चांगली लागतात. लोक अनेकदा फळे आणि भाज्यांची साले निरुपयोगी म्हणून फेकून देतात. पण हा लेख वाचल्यानंतर निरुपयोगी सालांच्या मदतीने एक नव्हे तर अनेक गोष्टी सोप्या करता येतील. (Uses for Vegetable and Fruit Peel Leftovers )
जर तुम्ही लिंबाची साल टाकाऊ म्हणून फेकून देत असाल तर तर ती फेकू नका. कारण लिंबाची साल आम्लासारखी असते, ज्याच्या मदतीने तुम्ही सिंक साफ करू शकता. लिंबू किंवा संत्र्याची साल टाकाऊ म्हणून फेकून दिली तर आता फेकू नका. साली पाण्यात टाकून काही वेळ उकळा आणि उकळल्यानंतर ते पाणी कालव्यावर शिंपडा. यामुळे कीटक कधीच मरणार नाहीत. (Uses of fruit and vegetable peels)
1) बटाट्याची सालं न काढताही तुम्ही क्रिस्पी चिप्स बनवू शकता. यासाठी बटाटा सालीसकट नीट स्वच्छ करून काप करून तेलात तळून घ्या आणि वर चाट मसाला किंवा काळे मीठ टाकून सर्व्ह करा.
2) केळीची साल फेकून देण्याऐवजी तुम्ही खत म्हणूनही वापरू शकता. होय, यासाठी केळीच्या सालीचे छोटे तुकडे करा आणि काही वेळ उन्हात ठेवल्यानंतर ते मातीत चांगले मिसळा.
आजारी आईला बरं वाटावं म्हणून वृद्ध लेकानं गाणं गात धरला ठेका; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
3) फळे किंवा भाज्यांची साल फेकून देण्याऐवजी तुम्ही कीटकनाशक फवारणी देखील करू शकता. यासाठी लिंबू किंवा संत्र्याची साल एक कप पाण्यात उकळून घ्या आणि पाणी गाळून त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका आणि मिक्स करा. तुम्ही संत्र्याच्या सालीनेही स्क्रब बनवू शकता. यासाठी साल सुकवून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आता या मिश्रणात मध, दही, मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळा.
4) आंघोळीमध्ये लिंबाची साल देखील वापरता येते. अंघोळीच्या एक तास आधी पाण्यात लिंबाची साल टाका. यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे किंवा वास येणे या समस्या दूर होतात.
याला म्हणतात प्रेम! गजबजलेल्या मेट्रोत बायकोसोबत सेल्फी घेण्यासाठी काकांची धडपड; पाहा व्हिडिओ
५) कांदा, आले, लिंबू किंवा संत्र्याच्या सालीच्या मदतीने किटकांच्या समस्येवरही मात करता येते. यासाठी एक लिटर पाण्यात सालं टाकून ते चांगले उकळून स्प्रे बाटलीत भरा. आता या मिश्रणात बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा.