Lokmat Sakhi >Social Viral > कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective कोल्ड ड्रिंक उरलं किंवा पडून असलं नुसतं तर ते वापरुनही उत्तम झटपट साफसफाई करता येतेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 05:14 PM2023-07-15T17:14:37+5:302023-07-15T17:15:39+5:30

Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective कोल्ड ड्रिंक उरलं किंवा पडून असलं नुसतं तर ते वापरुनही उत्तम झटपट साफसफाई करता येतेच.

Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective | कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

कोल्ड ड्रिंक्स पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण उरलेले, बऱ्याच दिवसापासून फ्रिजमध्ये पडून असलेले कोल्ड ड्रिंक वापरुन साफसफाई करता येते हे सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही? कोल्ड ड्रिंक ने बाथरुमच्या टाइल्स साफ करणारे व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल  होत असतात.  पण खरंच तसं करता येतं? काय काय साफसफाई आपण करु शकतो, पाहा यादी(Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective).

गंजाचे डाग

लोखंडी नळ किवा इतर वस्तू अनेकदा गंजतात, हे गंज काढण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंकचा वापर करू शकता. यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा एक छोटा तुकडा घ्या. त्याचा गोल चेंडू करा. आता बॉल कोल्ड ड्रिंक बुडवून गंज घासून काढा. गंज काही मिनिटात निघून जाईल.

जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल

जळकी भांडी

जळके डाग घासून देखील लवकर निघत नाही. जळकी भांडी स्वच्छ करायची असेल तर, आपण कोल्ड ड्रिंक्सचा वापर करू शकता. भांड्याच्या जळलेल्या भागावर कोल्ड ड्रिंक्स ओतून काही वेळ ठेवा. काही वेळानंतर स्क्रबरच्या मदतीने भांड्यांवरील जळालेले डाग काढा, धुवून टाका.

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

टाईल्सवरील डाग

बाथरूमच्या टाइल्सवरील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी उपयोग होतो. थोडा वेळ कोल्ड ड्रिंक शिंपडून ठेवा आणि नंतर धुवून पुसून टाका.

Web Title: Using Cold drinks to Clean Bathrooms: Is It Possible and Effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.